Urfi Javed shred post for bjp leader chitra wagh and said i join bjp  sakal
मनोरंजन

Urfi Javed: आता मी भाजपमध्ये प्रवेश करते.. उर्फी काही थांबायचं नाव घेईना..

भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील संघर्ष आता वाढत चालला आहे.

नीलेश अडसूळ

Urfi Javed: आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या रडारवर आलेली उर्फी जावेद जर भाजपमध्ये गेली तर.. तसं होणार नाही पण झालं तर मोठा हाहाकार होईल. याचीच चाहूल उर्फीने दिली आहे. भाजप नेते ज्यांच्या विरोधात बोलतात, त्याच व्यक्ती भाजप मध्ये आल्या तर त्यांच्यात दोस्ती होती, म्हणून मीही भाजपमध्ये जाते असा थेट इशारा उर्फीने दिला आहे. एक पोस्ट करत उर्फीनं हे जाहीर केल्याने अनेकांची झोप उडाली आहे.

(Urfi Javed shred post for bjp leader chitra wagh and said i join bjp )

उर्फी विरोधात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर न्युडिटी पसरवण्याचा आरोप त्यांनी उर्फीवर केला आहे. या तक्रारीनंतर उर्फीही चांगलीच भडकली आहे. उर्फी देखील सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत चित्रा वाघ यांना सुनावत आहे. अशातच उर्फीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

उर्फीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'या त्याचं महिला आहेत ज्या राष्ट्रवादीत असताना संजय राठोड यांच्या अटकेसाठी ओरडत होत्या. यानंतर त्यांचे पती लाच घेताना पकडले गेले, त्यामुळे त्यांनी पतीला वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर संजय राठोड आणि चित्रा वाघ हे दोघे खूप चांगले मित्र झाले. मी देखील भाजपमध्ये प्रवेश करते, मग आपण चांगले मित्र होऊ'

urfi javed post for chitra wagh

उर्फीवर सक्त कारवाई व्हावी यासाठी चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. तर उर्फीही त्यांना तोडीस तोंड उत्तर देत आहे. 'मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स आणि किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी' अशी मागणी वाघ यांनी केली आहे. तर पोलिसांसोबतच राज्य महिला आयोगालाही त्यांनी धारेवर धरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT