Urfi Javed On Ameesha Patel: Esakal
मनोरंजन

Urfi Javed On Ameesha Patel: '25 वर्ष काम मिळालं नाही म्हणुन ती ..', उर्फीनं घेतला अमिषासोबत पंगा

Vaishali Patil

Urfi Javed On Ameesha Patel: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल तिच्या आगामी 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ती सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या प्रमोशन दरम्यान तिने अनेक मुलाखती दिल्या आहेत. अशातच तिच्या एका मुलाखतीदरम्यानच वक्तव्य चर्चेत आलं आहे.

तिने OTT वर दाखवणाऱ्या कंटेंटबद्दल तिनं हे वक्तव्य केलं आहे. तिने गे, लेस्बियन आणि समलैंगिक कंटेंटबाबत मत मांडलं.

त्यात अमिषा पटेलच्या म्हणाली की, 'अलीकडे प्रेक्षक चांगल्या मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांच्या प्रतिक्षेत आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासह आजी-आजोबांच्या एकत्रित चित्रपट पाहायचे हा तो काळ गेला. ओटीटी माध्यमांवर समलैंगिकता, गे-लेस्बियन अशा प्रकारच्या सीरिजवर जास्त भर देण्यात येतो.'

सध्या अमिषाचं हे वक्तव्य सोशल मिडियावर चर्चेत आहे. नेटकरी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी अमिषाला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी तिच्यावर टिका केली आहे.

मात्र अमिषाचं हे वक्तव्य उर्फी जावेदला मुळीच पटलेलं नाही. तिने तिच्या इंस्टास्टोरीमध्ये अमिषाचा व्हिडिओ शेयर करत तिच्यावर टिका केली आहे.

या व्हिडिओ सोबत तिने लिहिलयं की, 'जेव्हा ती 'कहो ना प्यार है' म्हणते तेव्हा ते फक्त सरळ लोकांसाठी असते.

एक मोठं व्यक्तिमत्त्व कोणत्याही शिक्षणाशिवाय अशा संवेदनशील विषयांवर बोलणे खरोखरच त्रासदायक आहे. 25 वर्षांपासून काम न मिळाल्याने ती अत्यंत कडवट झाली आहे.'

Urfi Javed On Ameesha Patel

आता उर्फीनं दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे पुन्हा नवीन चर्चा सुरु झाल्या आहेत. जिथे फॅशनचा विषय असतो तिथे उर्फी जावेद हिच नाव तर येतच.

कारण तिनं तिच्या अतरंगी फॅशनमुळे फॅशन जगतात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. उर्फी जावेद नेहमीच आपले मुद्दे खुलेपणाने मांडतात आणि प्रत्येक मुद्द्यावर आपले मत खुलेपणाने बोलते. ती तिच्या या वक्तव्यामुळे वादातही अडकते आणि चर्चेतही येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT