Urfi Javed Slams hocky player Yuvraj walmiki for disrespectful comment on her. Google
मनोरंजन

Urfi Javed: हॉकीपट्टू युवराज वाल्मिकीला भिडली उर्फी, मागचा-पुढचा विचार न करता अभिनेत्रीनं थेट..

उर्फी जावेदच्या एका व्हिडीओवर हॉकीपट्टू युवराजनं कमेंट केल्यानं अभिनेत्रीचा संताप अनावर झाला अन् तिनं काही शॉकिंग आरोप खेळाडूवर केले आहेत.

प्रणाली मोरे

Urfi Javed: उर्फी जावेद आपल्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत येते अन् अनेकदा तर वादात सापडते. प्रत्येकजण तिला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल करताना दिसतो. बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या देखील तिला मिळाल्या आहेत. आणि तिनं देखील दरवेळी याची रितसर तक्रार केली आहे.

पण आता तिनं हार पत्करलीय आणि चक्क उर्फी भावूक झालेली पहायला मिळाली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यात ती भावूक झालेली दिसत आहे. तसंच सांगताना दिसत आहे की कसं हॉकीपट्टू युवराज वाल्मिकीनं तिला तिच्या कपड्यांवरनं हिणवलं आहे.(Urfi Javed Slams hocky player Yuvraj walmiki for disrespectful comment on her)

उर्फी जावेद आणि हॉकीपट्टू युवराज मध्ये सध्या वाद सुरु आहेत. पापाराझी विरल भयानीनं एक व्हिडीओ शेअर केला ,ज्यावर युवराजने कमेंट केली आहे,जी उर्फीला मुळीच आवडली नाही. उर्फीच्या त्या व्हिडीओला असं एडिट केलं आहे की,जसं काही ती जेलमध्ये आहे असा भास निर्माण केलाय. ती जेलमध्ये बंदिस्त दिसत होती आणि बोलत होती की-'पूर्ण भारताला जे पहायचं इतक्या दिवसापासून, हे अगदी तसंच आहे'. हा व्हिडीओ तेव्हा समोर आला जेव्हा दुबईत उर्फीला अतरंगी कपडे घालून रस्त्यावर फिरल्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

Urfi Javed Slams hocky player Yuvraj walmiki for disrespectful comment on her.

हॉकीपट्टू युवराजनं कमेंट करत लिहिलं होतं की, ''आभारी आहे दुबई..कृपया हिला तिथेच ठेवा. आम्ही खूप आभारी असू तुमचे''. यानंतर आता उर्फीनं कमेंट केली आहे. तिनं युवराजला टॅग करत लिहिलं आहे की,''युवराज तुला माझे कपडे खटकतात तरी देखील मेसेज करतोयस''.तर दुसऱ्या कमेंटमध्ये लिहिलं आहे की,''माझ्याकडे त्या मेसेजचा स्क्रीनशॉट आहे,जो तु मला आणि इतर ९९९९९ मुलींना केला होतास''.

Urfi Javed Slams hocky player Yuvraj walmiki for disrespectful comment on her.

एवढंच नाही तर उर्फी जावेदनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्क्रीनशॉट शेअर केला आहे,ज्यात युवराजनं लिहिलं होतं की ,त्यानं उर्फीला कधीच मेसेज नाही केला आणि दुसऱ्या मेसेजच्या स्क्रीनशॉटमध्ये युवराजनं उर्फीला हाय हॅलो म्हटलं आहे आणि तिची विचारपूस केली आहे. तिसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये उर्फी युवराजचा क्लास घेताना दिसत आहे. तिनं त्याचं काय बिघडवलं आहे,जे त्याने तिला जेलमध्येच ठेवा असं म्हटलंय असा सवाल उर्फीनं केला आहे. उर्फीनं यावेळी तिला बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांचा देखील उल्लेख केला आहे. असे धमक्या देणारे लोक मोकळेपणानं फिरतायत त्यांना हे लोक काही बोलत नाही असं देखील उर्फीन म्हटलंय.

Urfi Javed Slams hocky player Yuvraj walmiki for disrespectful comment on her.

तर आता उर्फी जावेदविषयी एका वेबसाईटला मुलाखत देताना युवराजनं म्हटलंय की-''उर्फीचं डोकं खराब झालंय. मी असं कधी कोणाला म्हटलेलं नाही पण ती खरंच हिणवण्यासारखीच व्यक्ती आहे''. त्यानंतर उर्फीला मेसेज करण्याविषयी युवराजनं स्पष्टिकरण दिलं की- ''जर तिच्याकडे मेसेज आहे तर तिनं तो शेअर करावा. मी सुरुवातीला विरल भयानीच्या पोस्टवर कमेंट केली होती की त्यानं हिला प्रमोट करणं बंद करावं. खरंतर मला हा अधिकार नाही..पण समोच्याला पण थोडी अक्कल हवी की त्यानं कुठे काय कपडे घालावेतय दीपिका पदूकोण बिकिनी घालून तर पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही''.

Urfi Javed Slams hocky player Yuvraj walmiki for disrespectful comment on her.
Urfi Javed Slams hocky player Yuvraj walmiki for disrespectful comment on her.

त्यानंतर उर्फीनं एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती रडताना दिसत आहे. म्हणाली, ''सगळेच माझ्यावर नको नको त्या कमेंट करत आहेत. खासकरुन तेव्हा, जेव्हा तुमचं अकाउंट व्हेरिफाइड आहे. तुम्ही एक पब्लिक फिगर आहात. तुमच्या कमेंट लोक चेक करतात. आणि तुम्ही अशा नको त्या कमेंट करत लोकांमध्ये चुकीचा मेसेज पसरवताय एका मुलीसंदर्भात''.

''मला बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी दिली जाते. मला त्याची तक्रार करायची आहे पण कितीवेळा ते करू. आता माझ्यासाठी सगळंच कठीण होऊन बसलंय. कृपया सगळं बंद करा. आणि तडक दुसऱ्या व्हिडीओत उर्फीनं माझ्या मनला येईल ते मी घालेन. जर कोणाला हे पटत नसेल तर नको पटू दे. मी बदलणार नाही''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT