Urfi Javed Google
मनोरंजन

Viral Video :उर्फीचा सेफ्टी पिन ड्रेस; चाहते म्हणाले,'टोचली तर....'

सोशल मीडियावर उर्फी नेहमीच आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत असते.

प्रणाली मोरे

उफ! उर्फी जावेद (Urfi Javed) च्या दिवसागणिक दिसणाऱ्या हटके अंदाजामुळे तिला ट्रोल करणारे वाढत असले तरी तिच्या अदांवर घायाळ होणारेही काही कमी नाहीत. सध्या तिचा एक नवा ड्रेस भलताच चर्चेत आहे. फॅशनच्या बाबतीत उर्फीचं डोकं दिग्गज फॅशन डिझायनरच्या देखील पुढे चालतं हे मान्य करायला हवं. तिचा नवा ड्रेस पाहून भल्या-भल्यांना चक्रावल्यासारखं होतंय.

उर्फीचा सेफ्टीपीन ड्रेस

उर्फी जावेदनं सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून आपला नवा लूक शेअर केला आहे. तिनं घातलेला नवा ड्रेस इतका हटके आहे की आपण कोणीच असा ड्रेस कधी पाहिला नसेल. आता आपण विचार कराल नेमका असा कोणता ड्रेस तिनं घातला आहे. विश्वास बसत नसेल तर उर्फी जावेदची नवीन पोस्ट नक्की पहा. नेहमीच आपल्या बोल्ड आणि सिझलिंग फॅशन सेन्सनी लोकांना भंडावून सोडणारी उर्फी जावेद आता चक्क सेफ्टीपीनांचा ड्रेस घालून दिसतेय. उर्फी आपल्या नवीन व्हिडीओत ब्राऊन रंगाची बिकनी घालून दिसत आहे. त्या बिकिनीवरच तिनं सेफ्टीपीनांचा वनपीस बनवून घातलेला आहे.

व्हिडीओमध्ये उर्फी डान्स करत सेफ्टीपिनांनी बनलेल्या आपल्या ड्रेसला फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरही आपल्या ड्रेसविषयीची उत्सुकता पहायला मिळत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं आपल्या ड्रेसचे डिटेल्स शेअर केले आहेत. उर्फीनं कॅप्शन मध्ये लिहिलं आहे,''हा ड्रेस संपूर्णतः सेफ्टीपीनांनी बनला आहे. याला बनवायला तीन दिवस लागले आहेत''. उर्फीनं या सेफ्टीपीनांच्या ड्रेससोबत खास मेकअपही केलेला दिसत आहे. ब्राऊन ग्लॉसी लिपस्टिक,आयलायनर आणि हायलायटरनी तिनं आपला मेकअप लूक परफेक्ट बनवला आहे.

लोकं उर्फीला पाहून काय म्हणतायत...

उर्फीनं बिकिनीवर घातलेला सेफ्टीपीनांचा ड्रेस पाहून लोकांनी तिच्या स्टाइलची प्रशंसा केलीय, तर काहींनी उर्फीला ट्रोल केलंय. एका नेटकऱ्यानं लिहिलंय-''मासे पकडायचं जाळं वाटतंय तुझा ड्रेस''. अनेकजणांनी उर्फीच्या सेफ्टीपीनांच्या ड्रेसवरुन तिची खिल्ली उडवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT