Urfi Javed in traditional look Esakal
मनोरंजन

Urfi Javed in traditional look: उर्फीची फॅशन पाहून आज जनता खुश ! नीना गूप्ताच्या लेकीनं दिलं खास गिफ्ट..

Vaishali Patil

आपल्या अनोख्या फॅशनमुळे प्रसिद्ध असलेली उर्फी जावेद ही तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आणि वादात असते. तिच्या फॅशनच्या चर्चाही दुरवर होतात.

सोशल मिडियावर तिचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. ती तिच्या फॅशनमुळेच नाही तर वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील वादात अडकते. तिला नेहमीत ट्रोल केलं जाते.

होय, आपल्या असामान्य फॅशन सेन्स आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.

मात्र यावेळी तिची अतरंगी फॅशन नव्हे तर तिनं फॅशनवर काहीही प्रयोग न केल्याने चर्चेत आली आहे. तिचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनाही त्याच्या डोळ्यावर विश्वास बसलेला नाही

उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती शॉर्ट ड्रेस नव्हे तर पाकिस्तानी सूट घालून कारमधून खाली उतरताना दिसली होती.

जांभळ्या रंगाचा सलवार सूट कानात सोनेरी झुमके आणि खुल्या केसांमध्ये उर्फी जावेदचा हा लूकनं सर्वांनाच मोहित केलं. गोल्डन कलरच्या एम्ब्रॉयडरी सलवार सूटमध्ये उर्फी जावेद खूपच सुंदर दिसत आहे.

तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. तिच्या या व्हिडिओला नेटकरी कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, "ती खूप सुंदर दिसत आहे" तर दुसर्‍याने लिहिले - उर्फी जावेद भारतीय कपड्यांमध्ये खूप छान दिसत आहे, तिने फक्त भारतीय कपडे घालावेत. पारंपारिक कपड्यात ती खुप छान दिसते.

उर्फी जावेदने घातलेला हा ड्रेस हाऊस ऑफ मसाबाने डिझाईन तयार केलेला होता. या लिलाक वाईन गार्डन कुर्तामध्ये उर्फी जावेद सगळ्यांची मन जिंकून घेतली.

नीना गुप्ताची लेक मासाबा ही उत्तम फॅशन डिझाईनर आहे. पारंपारिक आणि वेस्टर्न फॅशन च्या मिलापासाठी प्रसिद्ध असलेल्या हाऊस ऑफ मसाबा हा तिचाच बॅण्ड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT