Splitsvilla X4 : उर्फी जावेद तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फी तिच्या नवीन स्टाईलने दररोज इंटरनेटवर धुमाकूळ घालते. आता उर्फी पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार आहे. यंदाचा धुमाकूळ हा तिच्या ड्रेसिंग स्टाइलने नाही तर MTV वर सुरू होत असलेल्या स्प्लिट्सव्हिला X4 मुळे होणार आहे. तरुणांमध्ये विशेष चर्चेत असलेल्या या कार्यक्रमात आता उर्फी जावेद दिसणार आहे.
(Urfi Javed to participate in MTV Splitsvilla X4 with Sunny leone)
या कार्यक्रमाची होस्ट, सनी लिओनी हीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबतच माहिती दिली आहे की 'स्प्लिट्सव्हिला' हा शो 12 नोव्हेंबरपासून शनिवार आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होत आहे. व्हिडिओमध्ये सनी लिओनीशिवाय अनेक स्पर्धकही दिसत आहेत. त्याचवेळी उर्फी जावेद देखील या शोमध्ये असणार आहे. प्रोमोमध्येही ती दिसत आहे.
“मी अनेक वर्षांपासून MTV ‘Splitsvilla’ शो पाहते आणि फॉलो करतेय. या शो चा भाग होणं हे माझ स्वप्न होत जे आता खरं होताना दिसतंय, असं उर्फी म्हणाली'' उर्फी आणि सनी दोघीही प्रचंड लोकप्रिय आहेत. उर्फी आपल्या चित्र विचित्र फॅशनमुळे तर सनी लिओनी पूर्वी पोर्न स्टार असल्यामुळे दोघींची प्रचंड क्रेझ आहे. आता दोघीही एकाच मंचावर येत असल्याने नेटकरी भलतेच खुश झाले आहे.
व्हिडिओ शेअर करताना सनी लिओनीने लिहिले की, 'आदर्श प्रेम शोधण्याचा प्रवास खूप सुंदर असेल, कारण फक्त काही दिवस बाकी आहेत.' यासोबतच त्यांनी शो सुरू झाल्याची माहितीही दिली आहे. सनी लिओन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता हा शो लवकरच सुरू होत असल्याची माहितीही तिने आपल्या इंस्टा अकाऊंटवरुन दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.