Urfi Javed  eskal
मनोरंजन

Urfi Javed : जीन्स फाडली, उलटी घातली! 'माझ्या वाटेला जायचं नाही'

टीव्ही मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी उर्फी जावेद ही चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांना बिनधास्तपणे उत्तर देताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed tv entertainment actress now share jeans : टीव्ही मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी उर्फी जावेद ही चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांना बिनधास्तपणे उत्तर देताना दिसत आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद विरुद्ध चित्रा वाघ यांचा वाद सुरु आहे. त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आज चित्रा वाघ यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये उर्फी जावेदवर सडकून टीका केली आहे. आपण तिच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी तिच्याबाबत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. कोणी काय घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे उत्तर आयोगानं दिलं आहे.

Also Read - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

यासगळ्यावर चित्रा वाघ यांनी आयोगावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी बाकी काही का असेना उर्फीनं चार भिंतीच्या आड काय फॅशन करायची ती करावी रस्त्यावर नंगटपणा करु नये. तसे केल्यास आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे.

आता सोशल मीडियावर पुन्हा एकदा उर्फीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिनं जीन्स पँट फाडून ती उलटी परिधान करुन त्याचा टॉप म्हणून वापर केला आहे. असा फोटो शेयर करुन तिनं आपल्या नादाला कुणी लागू नये असेच सांगण्याचा तिनं प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी तिनं आपल्या एका ट्विटमध्ये तिनं चित्रा वाघ यांचा चित्रु असा उल्लेख केला होता.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उर्फी विरुद्ध चित्रा वाघ असा वाद सुरु झाला आहे. त्यामध्ये नेटकऱ्यांनी उर्फीची बाजू घेतली आहे. तिनं जशास तसे उत्तर चित्रा वाघ यांना दिले आहे. असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT