Urfi Javed  esakal
मनोरंजन

Urfi Javed : 'एमसी स्टॅन मला खूप आवडतो, माझं त्याच्यावर खूप प्रेम!' उर्फी त्याच्या प्रेमात

बिग बॉसचा यंदाचा विजेता म्हणून गौरवलेल्या एमसी स्टॅनचं सोशल मीडियावर अजुनही कौतूक होताना दिसतंय. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात तीव्र स्पर्धा होती.

सकाळ डिजिटल टीम

MC Stan Urfi Javed News : बिग बॉसचा यंदाचा विजेता म्हणून गौरवलेल्या एमसी स्टॅनचं सोशल मीडियावर अजुनही कौतूक होताना दिसतंय. शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन यांच्यात तीव्र स्पर्धा होती. अनेकांनी शिव हाच विजेता होणार अशी सोशल मीडियावर चर्चा होती. सलमाननं एमसी स्टॅनचा हात उंचावत त्याच्या नावाची घोषणा केली आणि सगळीकडे एमसी स्टॅनच्या नावाचा जयघोष सुरु झाला.

पी टाऊनमधील बेबी एमसी स्टॅन हा भारतामध्ये प्रसिद्ध रॅपर आहे. त्याची लोकप्रियता मोठी आहे. आपल्या हटक्या शैलीमुळे, बोलण्यामुळे आणि विक्षिप्त वागण्यामुळे देखील एमसी स्टॅन चर्चेत असतो. तरुणाईवर त्याचा प्रभाव प्रचंड आहे. यासगळ्यात टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील वादग्रस्त नाव उर्फीनं एमसी स्टॅनचं कौतूक केल आहे. तिनं त्याच्याविषयी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

उर्फीनं थेट आता एमसी स्टॅनविषयी प्रेमाची भावना व्यक्त केली आहे. मला तो खूप आवडतो आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. अशा शब्दांत उर्फीनं एमसी स्टॅनवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. मला जेव्हा एमसी स्टॅननं बिग बॉसमध्ये इंट्री केली तेव्हापासून असे वाटत होते की, त्यानं हा शो जिंकावा. आणि तसे झालेही. त्याच्या विजयानं मला खूप आनंद झाला आहे.

उर्फीच्या लोकप्रियतेविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेत राहणारं नाव म्हणून उर्फीचं नाव घ्यावं लागेल. काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला होता. त्यांना जशास तसं उत्तर देऊन उर्फीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

तूला एमसी स्टॅनसोबत काम करायला आवडेल का असा प्रश्न विचारल्यानंतर उर्फीनं जे उत्तर दिलं ते तिच्या चाहत्यांना आवडलं आहे.ती म्हणाली, माझी तयारी आहे. पण आता एमसी स्टॅन हा आता मोठा माणूस झाला आहे. तो मनानं खूप चांगला आहे. त्याला खूप खूप शुभेच्छा...उर्फीनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : भारत-पाकिस्तान लढतीवर अनिश्चिततेचं सावट! श्रीलंकेने जाहीर केले धक्कादायक अपडेट्स, सामना न झाल्यास...?

मंत्र्याने दिलेल्या घराची कॉन्ट्रोव्हर्सी ते लॉकडाउनमध्ये केलेलं लग्न; मराठमोळी सोनाली कुलकर्णी सध्या कुठे गायब आहे?

Crime: शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थ्यी गुड मॉर्निंग न बोलल्याने शिक्षकाचा पारा चढला; रागात मुलांना अमानुष शिक्षा, काय घडलं?

Belagum Fisheries : बेळगावात जलाशयांतून बहरले ‘रूपेरी पीक’; १२,३६० टन मत्स्य उत्पादनाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा आधार!

No.1 E-sakal.com Marathi News : जबाबदार आणि लोकाभिमुख पत्रकारितेची पावती; 5.6 कोटी युजर्ससह eSakalची ऐतिहासिक झेप

SCROLL FOR NEXT