Urfi Javed 
Chitra Wagh
Urfi Javed Chitra Wagh Esakal
मनोरंजन

Urfi Javed: "अरे यार! आता देवेंद्रजीसुद्धा.. "

Vaishali Patil

Urfi Javed Tweet On Chitra Wagh:  उर्फी ही आधी केवळ तिच्या अतरंगी फॅशनमुळं चर्चेत असायची. काही लोक तिला तिला ट्रोल करायचे तर काही लोक तिच्या फॅशनची प्रशंसा करायचे. उर्फी फक्त तिचे वेगवेगळ्या वस्तूचे ड्रेस तयार करायची आणि त्याचे व्हिडिओ पोस्ट करायची. ते व्हायरल व्हायचे. त्यामुळं अनेकांनी तिच्यावर टिका केली मात्र उर्फीनंही त्याच्या टिकेला उत्तरे दिलीत.

मात्र आता उर्फीने टक्कर घेतली ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत..दरम्यान हा वादही चित्रा वाघ यांनीच सुरु केला. त्यांनी तिचा एक व्हिडिओ पोस्ट करत तिला अटक करण्यांची मागणी केली आणि त्यांनतर उर्फीही फुल फॉर्ममध्ये आली. तिनेही ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर टिका केली.

उर्फीने पूर्ण कपडे घातल्याने आपल्याला ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं कारण दिलं तर चित्रा वाघ यांनी उर्फीला यावरुन फटाकरलही. आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

त्यानंतर उर्फीनं 'मेरी डिपी इतनी ढासू चित्रा मेरी सासू' असं ट्विट तिनं केलं. त्यांनतर तिने अनेक ट्विट केलीत. ' चित्रा ताई मेरी खास आहे.. फ्यूचर मे होनेवाली सास है.. ' यांसारखे ट्विट केलीत. त्याच्या या वादात राजकीय पक्षातील महिलांनीही त्यांची मतं मांडली.

त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही उर्फी वादावर त्याची प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, एक स्त्री म्हणून तिने जे काही केले आहे त्यात काहीही चुकीचे नाही असे त्या म्हणाल्या. तिने जे केले आहे, ते स्वतःसाठी केले आहे. आता यावरुनचं उर्फीनं पुन्हा ट्वीट करत चित्रा वाघ यांना चिमटा काढला. तिने ट्वीट करत लिहिलं, ‘अरे यार! आता तर देवेंद्रजींचा पण सपोर्ट नाही तुम्हाला...’


हेही वाचा - या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन उर्फी जावेद आता काही थांबायला तयार नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबत तिच शाब्दिक युद्ध सुरुचं आहे. आता या वादात कोण योग्य कोण अयोग्य हा तर वेगळाच विषय आहे मात्र यामुळे नेटकऱ्याचं मनोरंजन होत आहे. असं बोलणं वावगं ठरणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT