Urfi Javed tweet on chitra wagh said chitra tai meri khaas hai  sakal
मनोरंजन

Urfi Javed: चित्रा ताई मेरी खास है.. सूनबाई ऊर्फी पुन्हा म्हणाली चित्रा वाघ माझी सासू..

चित्रा वाघ यांनी उर्फीवर केलेल्या टिकेनंतर ती चांगलीच चवताळली आहे.

नीलेश अडसूळ

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आली आहे. दिवसेंदिवस भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. काल रात्रीच उर्फीनं अंडरवेअरच उदहारण देऊन चित्रा वाघ यांना डिवचलं होतं. त्याला आता एक दिवसही उलटून गेला नाही तोवरच उर्फीने पुन्हा एक ट्विट केलं आहे. तिने पुन्हा एकदा सासू असा उल्लेख करून चित्रा वाघ यांना आव्हान दिलं आहे.

(Urfi Javed tweet on chitra wagh said chitra tai meri khaas hai )

आपल्या तऱ्हेवाईक फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. गेल्या दोन आठवड्यांपासून चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यातील तू तू मैं मैं सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.


उर्फीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन चित्रा वाघ यांच्याविरोधात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या वेळेस तिनं आपल्या फोटोंच्या माध्यमातून वाघ यांना उत्तर दिले होते. त्यानंतर तिनं चित्रा वाघ यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना चित्रू असे म्हटले होते. आताही उर्फीचं ट्विट आणि तिचं इंस्टा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

दोन दिवसांपूर्वीच इंस्टावर बायो अपडेट करताना उर्फीनं चित्रा वाघ यांचा उल्लेख सासूबाई असा केला होता. यापूर्वी तिनं ट्विटवर देखील असेच म्हटले होते. आता पुन्हा एकदा तिने चित्रा वाघ यांच्या नावाने दोन ओली ट्विट केल्या आहेत. ' चित्रा ताई मेरी खास आहे.. फ्यूचर मे होनेवाली सास है.. ' असं म्हणत तिने पुन्हा चित्रा वाघ यांची खोड काढली आहे.


चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवरून तिला टार्गेट केले होते. जी काही फॅशन करायची ती घरात करायची सार्वजनिक ठिकाणी आपला पेहराव हा योग्यच हवा. अशी वाघ यांची भूमिका आहे. त्यासाठी त्यांनी उर्फीला इशारा दिला. मात्र त्या दोघींमधील वाद हा आणखीनच वाढत चालल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT