Urfi Javed Esakal
मनोरंजन

Urfi Javed: आता थेट अंगावर नागालाच गुंडाळून आली उर्फी..नागाचं नाव घेत लोक म्हणाले,'अरे हा तर आपला..'

उर्फी जावेदचा नवा फॅशन अवतार सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून जोरदार व्हायरल होत आहे. आणि लोकांच्या भन्नाट कमेंट्स वाचून हसून पुरती वाट लागतेय.

प्रणाली मोरे

Urfi Javed: उर्फी जावेद हे एक अजब रसायन आहे. बोल्ड,बिनधास्त तर ती आहेच पण तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे ती अधिक चर्चेत आलेली पहायला मिळते. अनेकदा तिच्या य़ा फॅशन सेन्समुळे तिला ट्रोल केलं जातं. पण ऐकेल ती उर्फी कुठली.

तिच्या आधीच्या ड्रेसपेक्षा तिचा नवा अवतार नेहमीच सर्वांना धक्का देऊन जातो. आता तर ती अंगावर चक्क रंगवलेला साप गुंडाळून आली आणि नेटकऱ्यांनी डोक्यावर हातच मारला. (Urfi Javed Video viral netizens trolled )

उर्फी जावेद एका कुठल्यातरी कार्यक्रमासाठी आली होती ..ज्यात तिनं घातलेला कॉश्युम सगळ्यांनाच हैराण करुन गेलाय. तिनं खाली हिरव्या रंगाचं लुंगीसारखं काहीतरी गुंडाळलं आहे ज्यात तिला धड चालताही येत नाहीय हे स्पष्ट दिसतंय.

तर वर अंगावर चक्क नागाला गुंडाळलाय बयेनं. रंगबिरंगी रंगातला उर्फीच्या अंगावरचा हा नाग पाहून लोक भन्नाट कमेंट्स करत सुटलेयत. सोशल मीडियावर सध्या उर्फीचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

उर्फी जावेदचा हा नवा अवतार पाहून कुणी म्हणतंय,'एकता कपूरची 'नागिन ७' ची हीच ती नागीन..', तर कुणी म्हणतंय, 'हिच्या या नागीन ड्रेसनं नागिणीचा पण अपमान झाला..तिचा पण दर्जा असतो...'

तर कुणी लिहिलंय..'फॅशनची अम्मा..उर्फी मम्मा.', .तर कुणी उर्फीच्या अंगावरच्या नागाला पाहून 'बया चक्क अॅनाकोन्डा गुंडाळून आली वाटतं.. 'असं लिहिलं आहे.

उर्फीचा हा व्हायरल व्हिडीओ बातमीत जोडला आहे तेव्हा त्यावरील भन्नाट कमेंट्स वाचायला विसरू नका..तेवढाच थकलेल्या दिवसांत थोडा विरंगुळा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ODI मध्ये यशस्वी होण्यासाठी, ऋतुराज गायकवाडला भारत सोडण्याचा सल्ला; हा फलंदाज परदेशात असता तर...

Loni Kalbhor Police : लोणी काळभोर पोलिसांची 'सुपरफास्ट' कामगिरी; २५० कि.मी पाठलाग करून १३ वर्षीय मुलीची सुटका!

Narayangaon Crime : नारायणगाव पोलिसांची मोठी कामगिरी; गहाळ झालेले ९ लाख ९६ हजारांचे ३८ मोबाईल शोधून मूळ मालकांना केले सुपूर्द!

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल

Velhe Panchayat : वेल्हे बुद्रुक ग्रामपंचायत सदस्यांची अपात्रता स्थगित; मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला आदेश!

SCROLL FOR NEXT