Urmila kanetkar kothare news look as manjula satarkar in Tuzech Mi Geet Gaat Aahe marathi serial on star pravah
Urmila kanetkar kothare news look as manjula satarkar in Tuzech Mi Geet Gaat Aahe marathi serial on star pravah sakal
मनोरंजन

Urmila Kothare: उर्मिलाचा फटाकडी अवतार पाहून चाहत्यांची विकेट, आता दिसणार..

नीलेश अडसूळ

Urmila Kanitkar kothare: मराठी मनोरंजन विश्वातील एक देखणी आणि कसदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. गेली अनेक वर्षे ती मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. अभिनेत्री म्हणून ती चर्चेत आहेच पण ती कोठारे घराची म्हणजे महेश कोठारे यांची सून आहे.

गेली काही दिवस तिच्या कामपेक्षा तुझ्या वैयक्तिक आयुष्याचीच चर्चा अधिक आहे. पण पुन्हा एकदा उर्मिला आपल्या दमदार अभिनयाने उर्मिला प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे. कारण एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत उर्मिला आपल्याला दिसणार आहे.

नुकताच तिचा हा लूक समोर आला असून चाहते तिला पाहातच राहिले आहेत. तिच्या या हटके रूपाची सध्या बरीच चर्चा आहे.

(Urmila kanetkar kothare news look as manjula satarkar in Tuzech Mi Geet Gaat Aahe marathi serial on star pravah)

स्टार प्रवाहच्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेत नुकतीच मंजुळा सातारकरची धमाकेदार एण्ट्री झाली आहे. मंजुळाच्या येण्याने स्वराजला आपली आई वैदेहीच परत आल्याची खात्री झाली आहे. आणि ही भूमिका अभिनेत्री उर्मिला कानेटकर साकारत आहे.

वैदेही सारखी दिसत असली तरी मंजुळा म्हणजे वैदेही नव्हे. आतापर्यंत स्वराज आणि तिची भेट झाली होती. मात्र आता लवकरच मंजुळा कामतांच्या घरात दाखल होणार आहे. पिहूला लोकसंगीत शिकवण्याच्या बहाण्याने तिने कामतांच्या घरात प्रवेश केला असला तरी तिचा मनसुबा मात्र भलताच आहे. आता मंजुळाच्या येण्याने स्वराज आणि मोनिकाच्या आयुष्यात येणारं नवं वादळ कसं असेल, हे पाहणं उत्कंठा वर्धक असणार आहे.

पण आजवर पाहिलेली मंजुळा आणि आता कानेटकरांच्या घरात जाणारी मंजुळा यांच्यात फरक असणार आहे. एरव्ही सर्वांवर आपली हुकुमत गाजवणाऱ्या मोनिकाला मंजुळा आपल्या हटके स्टाईलने उत्तर देताना दिसेल. या भूमिकेसाठी मंजुळाने नवं रुपही धारण केलं आहे.

साडी, ठसठशीत कुंकू आणि लक्ष वेधणारे दागिने असा काहीसा मंजुळाचा म्हणजे उर्मिलाचा अंदाज यापुढील भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी ती बरीच मेहनत घेताना दिसतेय.

एरव्ही उर्मिलाला आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या भूमिकेसाठी बोलीभाषेपासून पोषाखापर्यंत सर्वच बाबतीत तिचं नवं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मंजुळाच्या येण्याने मालिकेत आता कोणतं नवं नाट्य घडणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT