Urmila Matondkar Instagram
मनोरंजन

Urmila Matondkar: 'मॅडम, तुम्ही अक्षय तृतिया साजरी करत नाही का?', उर्मिलावर भडकली मराठमोळी चाहती

उर्मिला मांतोंडकरनं ईदच्या दिवशी केलेल्या एका पोस्टवरनं काही चाहत्यांनी तिला थेट सवाल केले आहेत.

प्रणाली मोरे

Urmila Matondakar: ईद निमित्तानं आज सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज ईद असली तरी आज अक्षय तृतिया देखील आहे. साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. आज अनेक हिंदू धार्मिक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रीय आहे आणि तिनं लग्न मुस्लिम धर्मात केलं आहे..हे आता जगजाहिर आहे. असं असलं तरी उर्मिला मुस्लिम धर्माचा सम्मान करतानाच आपल्या मराठी परंपरेला विसरलेली नाही हे अनेकदा समोर आलं आहे.

पण आज ईद निमित्तानं तिनं केलेली एक पोस्ट मात्र अनेकांना खटकली आहे. चला जाणून घेऊया नेमकं झालं तरी काय?(Urmila Matondkar Eid 2023 post actress trolled)

उर्मिला मातोंडकरनं सोशल मीडियावर ईद निमित्तानं चाहत्यांना शुभेच्छा देणारी एक पोस्ट केली. सोबत काही फोटो देखील तिनं पोस्ट केले. या तिच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत तिला देखील ईदच्या शुभेच्छा दिल्या.

उर्मिलाच्या या पोस्टवर अगदी थेट पाकिस्तानातूनही प्रतिक्रिया आल्या आहेत. पाकिस्तानातील तिच्या काही चाहत्यांनी तिला ईदच्या शुभेच्छा दिल्याचं दिसत आहे. पण या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये एका कमेंटनं मात्र लक्ष वेधून घेतलं आहे.

तिच्या एका मराठी भाषिक चाहतीन अस्खलित मराठीत तिला प्रश्न केला आहे की, 'मॅडम..तुम्ही अक्षय तृतिया नाही का साजरी करत?'

उर्मिलाच्या या पोस्टवर कुणी तिला म्हटलंय,'मला तुला पाहिल्यावर २००० सालचा काळ आठवला', तर कुणी म्हटलंय,'आता म्हातारी दिसतेस..',तर इजिप्तमधील एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं आहे,'तू आजही तशीच फ्रेश दिसतेस..'

उर्मिला आता राजकारणातही सक्रिय पहायला मिळते. सिनेमामुळे जरी ती चर्चेत येत नसली तरी राजकारणाशी संबंधित केलेल्या एखाद्या वक्तव्यामुळे ती चर्चेत आलेली दिसतेच. 'रंगीला','कौन','भूत' सारख्या सिनेमांनी उर्मिलाचा आपला असा एक चाहतावर्ग निर्माण केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीत सुरू होणार मोठं मिशन; भारतात का येतेय ही अवकाश गुप्तचर कंपनी? छोट्या उपग्रहांची मोठी तयारी

IND vs SL 2nd Test: भन्नाट,भन्नाटssss! यशस्वी जैस्वालचा हा कॅप पाहाच, श्रीलंकेच्या ओपनरला झोप लागली नसेल Video Viral

Devendra Fadnavis: महिला आरक्षण २०३४ पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न; विरोधक महिलांना आरक्षणापासून रोखताहेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

Marathi News Live Updates : साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetty: देशात ४८ लाख टन साखर गायब; २० हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा राजू शेट्टींचा आरोप, प्रतिटन ५ हजार रुपये द्यावेत

SCROLL FOR NEXT