Urmila Matondkar revealed Secret about Janhavi Kapoor's Birth. Instagram
मनोरंजन

Urmila Matondkar चा जान्हवी कपूरच्या जन्मासंबंधी मोठा खुलासा, म्हणाली...

उर्मिला मातोंडकरनं एका रिअॅलिटी शो दरम्यान श्रीदेवी यांच्याविषयीची आठवण शेअर करत हा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Urmila Matondkar: श्रीदेवी(Sridevi),अनिल कपूर आणि उर्मिला मातोंडकर यांचा जुदाईे(Judai) सिनेमा फेब्रुवारी १९९७ मध्ये रिलीज झाला होता. नुकतेच एका डान्स रिअॅलिटी शो दरम्यान उर्मिलानं मोठा खुलासा केला आहे. ती म्हणाली आहे,''जुदाई सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी श्रीदेवी प्रेग्नेंट होत्या. जान्हवी कपूर(Janhavi Kapoor) त्यांच्या पोटात होती''.(Urmila Matondkar revealed Secret about Janhavi Kapoor's Birth).

त्या रिअॅलिटी शो मध्ये एका स्पर्धकानं प्रेग्नेंट भूमिका डान्सच्या माध्यमातून साकारली होती. त्याच गोष्टीनं उर्मिलाला जुदाई सिनेमातील आपल्या सहकलाकार श्रीदेवी यांची आठवण करुन दिली. उर्मिला म्हणाली,''सिनेमातील गाण्याचं शूट होत होतं तेव्हा श्रीदेवी जान्हवीच्या वेळी प्रेग्नेंट होत्या''. उर्मिला म्हणाली, ''या गाण्यानं मला खूप भावूक केलं, मला जुदाईच्या आमच्या त्या गाण्याशी कनेक्ट केलं''.

श्रीदेवीनं बोनी कपूर यांच्याशी जून,१९९६ मध्ये लग्न केलं. आणि दोघांनी आपलं पहिलं अपत्य म्हणजे जान्हवी कपूरला ६ मार्च,१९९७ रोजी जन्म दिला. आणि त्यानंतर काहीच दिवसांनी 'जुदाई' सिनेमा रिलीज झाला होता. त्यावेळी श्रीदेवी लग्नाआधीच प्रेग्नेंट होत्या अशा चर्चांनाही ऊत आला होता.

जान्हवी कपूरचा गूड लक जेरी हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि ती लवकरच मि. अॅन्ड मिसेस माही या सिनेमात राजकुमार राव सोबत दिसणार आहे. नितेश तिवारीच्या बवाल मध्ये आणि करण जोहरच्या दोस्ताना 2 मध्ये देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT