urmila nimbalkar shared experience of depression while she removed from marathi serial  SAKAL
मनोरंजन

Urmila Nimbalkar: "तडकाफडकी मालिकेतुन काढलं अन् ..", उर्मिला निंबाळकरने सांगितला डिप्रेशनचा भयावह अनुभव

उर्मिलाने तिच्या यूट्यूब चॅनलवर तिला आलेला डिप्रेशनचा अनुभव शेअर केलाय

Devendra Jadhav

उर्मिला निंबाळकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. उर्मिला निंबाळकर ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि युट्यूबर आहे.

उर्मिलाच्या युट्यूब चॅनलने १ मिलियनचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने उर्मिलाने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केलंय.

(urmila nimbalkar shared experience of depression)

आणि मला मालिकेतुन काढून टाकलं

उर्मिला निंबाळकरने तिच्या यू ट्यूब चॅनलवर तिला आलेला अनुभव सांगितला आहे. उर्मिला म्हणाली, "ती एके दिवशी मालिकेच्या सेटवर आली. तेव्हा कोणीही तिच्याकडे बघत नव्हतं. मेकअप आर्टिस्ट तिच्याकडे दुर्लक्ष करत होते.

अशातच उर्मिलाला कळलं की तिला मालिकेतून काढून टाकलं आहे. उर्मिलाला सेटवर जाता येत नव्हतं. कलाकार थांबले होते. तितक्यात एक प्रोडक्शन मध्ये काम करणारी मुलगी तिला येऊन म्हणाली की चॅनलने मला मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय."

उर्मिला तणावामुळे डिप्रेशनमध्ये गेली

उर्मिला पुढे म्हणाली, "जेव्हा मला मालिकेतुन काढण्यात आलं तेव्हा मला वाटलं की मी खूप फालतू आहे. अयशस्वी आहे. मूर्खासारखं सगळं सोडलं, सगळं दिलं. माझ्या आयुष्याची वाताहत झाली. पुढे प्रोडक्शन हाऊसने मला एके ठिकाणी नेलं आणि सांगितलं की तू सारखी आजारी आहेस. आणि सही करून घेतली की तू स्वतःहुन मालिका सोडतेस.

मी खूप दुःखात गेले.. माझा आत्मविश्वास गेला. मी घाण दिसतेय. तुझी दाढी मिशी दिसते. तुझा तीळ काढला तर सुंदर दिसशील. अशा कमेंट यायच्या.

2016 मला हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मी सेटवर बेशुद्ध झाली.. मी त्या कागदपत्रांवर सही केली म्हणून त्यांचं नाव घेऊ शकत नाही.

खूप गोष्टी गमावल्या. पैसे गेले.. खूप गोष्टी केल्या. दोष कोणाला दिला जातो. मी सोडली मालिका असं मी सगळ्यांना सांगितलं. पण कोणालाच माहीत नाही की मला काढलं गेलं. मी सेटवर माज करायची म्हणून मला काढलं अशा चर्चा सुरू झाल्या." उर्मिलाने तिच्या युट्यूब चॅनलवर ही संपूर्ण मुलाखत शेअर केलीय."

उर्मिलाला गुगल इंडीयाकडून आमंत्रण

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचं सोशल मिडीयावर खुप फॅन फॉलोईंग आहे. उर्मिला आता एक प्रसिद्ध युट्यूबर सुद्धा झाली आहे. उर्मिला तिच्या युट्यूबच्या चॅनलमुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे.

मराठमोळ्या उर्मिलाची आता थेट 'गुगल'भरारी झालीय. गुगल इंडीयाकडून उर्मिलाला आमंत्रण मिळालं असुन देशातील मानाच्या क्रिएटर्समध्ये उर्मिलाला स्थान मिळालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT