Urvashi Car Accident esakal
मनोरंजन

Urvashi Car Accident : अभिनेत्री उर्वशीच्या कारचा अपघात, शुटींगला जाताना घडली घटना

टीव्ही आणि चित्रपट मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिच्या कारचा अपघात झाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Urvashi Car Accident : टीव्ही आणि चित्रपट मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिच्या कारचा अपघात झाल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. शुटींगच्या निमित्तानं ती मीरा रोडवरून फिल्म स्टुडिओकडे निघाली होती. त्यावेळी हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे.

शाळेतून मुलांना घरी घेऊन जाणाऱ्या एका बसनं उर्वशीच्या कारला जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमधून उर्वशी थोडक्यात बचावली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात एवढा जबदरस्त होता की, अभिनेत्रीच्या कारचे त्यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

मात्र यासगळ्यात अजुन कुणी पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. उर्वशी आणि त्या बस ड्रायव्हरनं कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.उर्वशीचं म्हणणं आहे की, छोटासा अपघात होता. मला यात कोणतीही दुखापत झालेली नाही. डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

Urvashi Car Accident

उर्वशीच्या बाबत सांगायचे झाल्यास ती टीव्ही मनोरंजन विश्वातील मोठी अभिनेत्री आहे. अजुनही ती काही लीड अॅक्ट्रेस नसली तरी सोशल मीडियावर तिची लोकप्रियता मोठी आहे. तिनं खलनायिका प्रकारच्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोमोलिका म्हणून तिची भूमिका प्रेक्षकांना कमालीची आवडली होती. याशिवाय तिनं नागिन ६ मध्ये केलेली भूमिका चाहत्यांच्या लक्षात राहिली आहे.

उर्वशी ही तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली होती. उर्वशीनं १६ व्या वर्षी लग्न केलं होतं. १७ व्या वर्षी तिनं दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. त्याचं नाव सागर आणि क्षितिज असे आहे. लग्नानंतर ती दोन वर्षानंतर वेगळी राहु लागली. तिनं घटस्फोट घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT