Urvashi Rautela Esakal
मनोरंजन

Urvashi Rautela: 'ऋषभला भेटून आली वाटतं',विमानतळावर उर्वशी लागली वेड्यागत उड्या मारायला! नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

Rishabh Pant : उर्वशीचा विमानतळावरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती धमाल-मस्तीत नाचताना दिसत आहे.

Vaishali Patil

Urvashi Rautela: अभिनेत्री उर्वशी रौतेला एक चर्चेतलं नाव आहे. ती जरी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरही तिची चर्चा असतेच. तिने काहीही केलं नाही तरीही ती ट्रोल होतं असते.

नेटकरी तिच्या व्हिडिओवर लक्ष ठेवुन असतात. तिचे व्हिडिओ नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

ती नेहमी बोल्डनेस आणि हॉटनेसनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. त्याचबरोबर उर्वशी भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज रिषभ पंत यांच्यामुळे चर्चेत आहे. तिने काहीही केलं तरी नेटकरी त्याचा संबध रिषभ पंतसोबत लावत असतात.

स्टाईल दिवा असलेली उर्वशी तिच्या प्रत्येक देखाव्यासह उत्कृष्ट स्टाइल स्टेटमेंट करते. उर्वशी पारंपारिक लूक असो किंवा वेस्टर्न लूक ती अप्रतिमच दिसते. उर्वशीचं सोशल मीडियावरील आकर्षण कुणापेक्षा कमी नाही. उर्वशीच्या सुंदर आणि ग्लॅमरस फोटोंनी इंस्टाग्राम भरले आहे. तिचे फोटो व्हायरलही होतात.

आज पुन्हा एकदा उर्वशी एअरपोर्टवर स्पॉट झाली. तिने तिच्या लेटेस्ट लूकने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. उर्वशीचा विमानतळावरील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती धमाल मस्ती करत नाचताना दिसली आहे.

इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये उर्वशीने लाल रंगाचा स्टनिंग हाय स्लिट ड्रेस परिधान केला आहे. उर्वशीने चेहऱ्यावर मास्क लावला अन् डोळ्यांवर काळा गॉगल घातला होता. या व्हिडिओमध्ये उर्वशी खूप मस्ती करत हसताना आणि डोलताना दिसत आहे.

उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ विरल भयानीच्या अधिकृत इन्स्टा हँडलवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यात उर्वशीचा व्हिडिओ असला आणि नेटकऱ्यांना ऋषभ नाही आठवला असं होऊ शकत नाही. त्यांनी पुन्हा उर्वशीला ऋषभच्या नावानं चिडवलं आहे.

एका यूजरने कमेंटमध्ये लिहिलयं की, 'ऋषभ पंतला भेटून आनंद झाला आहे'. तर दुसऱ्याने लिहिले, 'नाही, बहुधा ऋषभला भेटणार जाणार आहे'. कुणी उर्वशीला राखी सावंतचं लाईट व्हर्जन म्हटलं. इतकच नाही तर एकानं तिला मॅडम हे विमानतळ आहे, रॅम्प नाही. असं देखील म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT