Urvashi Rautela On India vs Austarlia Final:  Esakal
मनोरंजन

India Vs Australia CWC 2023: " मला विश्वास आहे की..." उर्वशी रौतेलानं केली भविष्यवाणी! सामना पाहण्यासाठी पोहचली अहमदाबादला

सध्या सोशल मिडियावर उर्वशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ती टीम इंडिया आणि तिच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल बोलताना दिसत आहे.

Vaishali Patil

Urvashi Rautela On India vs Austarlia Final: गेल्या काही महिन्यांपासून ज्या क्षणाची सर्व भारतीयांना प्रतिक्षा लागली होती तो आता आला आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील ICC विश्वचषक 2023 चा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आता सामना सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे.

अशा परिस्थितीत या महामुकाबल्याचा आनंद घेण्यासाठी क्रिकेटर आणि बॉलिवूड सेलिब्रिटीही अहमदाबादला पोहोचत आहेत. अभिनेता विवेक ओबेरॉय त्याचा मुलगा विवानसोबत अहमदाबादला पोहोचला होता. तर सारा तेथील अहमदाबादला पोहचली आहे.

आता हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला देखील अहमदाबादला पोहचली आहे. सध्या सोशल मिडियावर उर्वशीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात ती टीम इंडिया आणि तिच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल बोलताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये अभिनेत्री विमानतळावर दिसत आहे यावेळी मीडियाने तिला पाहिले आणि वर्ल्ड कप फायनलबाबत प्रश्न विचारले. यावेळी उर्वशी म्हणाली, 'मी खूप उत्साहित आहे. भारतच विश्वचषक ट्रॉफी जिंकेल असा मला विश्वास आहे.' यासोबतच तिने विश्वचषक ट्रॉफी हातात घेऊन त्याला किस केलं असल्याचा अनुभव देखील शेअर केला.

तिला कोणता क्रिकेटर खुप आवडतो याबद्दल बोलाताना तिने सांगितले की संपूर्ण टीम तिची फेव्हरेट आहे.

आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामना पाहण्यासाठी रजनीकांत, शाहरुख, सलमान खान, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग , रणबीर कपुर असे अनेक लोकप्रिय कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT