Urvashi Rautela Esakal
मनोरंजन

Urvashi Rautela: ऋषु कुठयं तू वहिनींना धमकी दिलीय! IPL सामन्यात घडलं काय?

Vaishali Patil

उर्वशी रौतेलाही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सौदर्यवती आहे. ती तिच्या निरागस सौंदर्य आणि जबरदस्त लुकसाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते.

तिचे नाव अनेक क्रिकेटर सोबत जोडले जाते. मात्र कामापेक्षा उर्वशीच्या अफेअरचीच जास्त चर्चा आहे. खरे तर तिचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडले गेले आहे तर कधी नसीम सोबत त्यामुळे क्रिकेट प्रेमींचही तिच्याकडे विषेश लक्ष असतं. सध्या सर्वत्र आयपीएलचीच चर्चा आहे. उर्वशीही काही दिवसांपुर्वी स्टेडियमध्ये दिसून आली होती.

दरम्यान आता पुन्हा उर्वशी क्रिकेटमुळे चर्चेत आली आहे. नुकताच उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक क्रिकेट फॅन तिला चक्क धमकी देतांना दिसत आहे.

आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये उपस्थित असलेला चाहता उर्वशीचे नाव घेऊन तिला धमकावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिला धमकी देणाऱ्या व्यक्तीला उर्वशीनं चांगलचं फटकारलं आहे.

उर्वशीच्या इन्स्टावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती तिला म्हणतोय की, आम्ही उर्वशी रोटेला सोडणार नाहीत..त्यानंतर तो सामना खेळणारा क्रिकेटर अक्षर पटेलला त्याच्याकडे वळतो आणि त्याला या व्हिडिओत पाहण्याची विनंती करतो.

आता हा व्हिडिओ उर्वशीने शेअर केला आहे. तिने कॅप्शन दिले, "माझ्या आडनावाची खिल्ली उडवू नका....ते माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे..नाव आणि आडनावासोबत आशीर्वाद आणि उर्जा येते...."

आता हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात काही नेटकरी आता तिला ट्रोल करत आहेत तर काही तिच्या बाजूने बोलतांना दिसत आहे. उगाच अभिनेत्रीचं नाव घेवुन तिला त्रास देणं बंद करा असं उर्वशीच्या चाहत्यांनी सांगितलं आहे.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच राम पोथिनेनीसोबतही दिसेल. तसंच, 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसणार आहे. उर्वशी थ्रिलर सिनेमा 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. तसंच साऊथचा 'थिरुट्टू पायले २' च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT