Urvashi Rautela:  Esakal
मनोरंजन

Urvashi Rautela: आता बस्स..खपवून घेणार नाय! खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर उर्वशी भडकली..नोटिसच पाठवली..

Vaishali Patil

हिंदी चित्रपटसृष्टीतील सौदर्यवतींमध्ये उर्वशी रौतेलाच्या नावाचाही सामावेश होतो. उर्वशी रौतेला तिच्या निरागस सौंदर्य आणि जबरदस्त लुकसाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटांपेक्षा वयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते.

तिचे नाव अनेक क्रिकेटर सोबत जोडले जाते. मात्र कामापेक्षा उर्वशीच्या अफेअरचीच जास्त चर्चा आहे. खरे तर तिचे नाव क्रिकेटपटू ऋषभ पंतशी जोडले गेले आहे तर कधी नसीम सोबत

पण सध्या उर्वशी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्वशी खुपच रागात आहे. तिच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे तिने आता मानहानीची नोटीस पाठवली आहे. आता ती त्या व्यक्तवर कायदेशीर कारवाई करणार आहे अशा बातम्याही समोर येत आहे.

स्वत:ला चित्रपट समीक्षक म्हणवणारा उमर संधू हा त्याच्या वेगवेगळ्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो रोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्याबद्दल मूर्खपणाच्या आणि खोट्या गोष्टी लिहित असतो. त्याच्या या ट्विटवर दुर्लक्ष करणारे बरेच कलाकार आहेत.

तर काही कलाकार त्याला प्रत्युत्तरही देतात. अलीकडे, त्याने अर्जून आणि मलायका यांच्या नात्याबद्दलही ट्विट केल होत. इतकच नाही तर मागे त्याने सेलिना जेटलीबद्दल ट्विट केले होत आणि तिचा आणि फरदीन खान आणि फिरोज खान यांच्यात संबध होते असं ट्विट केले होत ज्यावर तिने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.

आता उमर संधूने पुन्हा तिच चुक केली. यावेळी त्याने उर्वशीबद्दल अश्लील लिखाण केले आहे. उमर संधूने ट्विट केले की, 'युरोपमध्ये 'एजंट'च्या आयटम साँगच्या शूटिंगदरम्यान अखिल अक्किनेनी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा छळ केला.

अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, अभिनेते खूप बालिश वागतो, त्यामुळे तिला त्यांच्यासोबत काम करण्यास अस्वस्थ वाटत. यामध्ये त्यांने अखिल आणि उर्वशी दोघांचा फोटो जोडला होता.

आता हे ट्विट वाचून उर्वशी चांगलीच भडकली. तिने या ट्विटचा स्क्रीनशॉट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आणि त्यावर FAKE असं लिहिलं आहे.

इतकच नाही तर, 'माझी कायदेशीर टीम तुम्हाला मानहानीची नोटीस पाठवत आहे. तुमच्यासारख्या पत्रकाराच्या ट्विट्सचा सर्वांनाच राग आहे. तुम्ही माझे अधिकृत प्रवक्ते नाही आहात आणि हो तुम्ही खूप बालिश पत्रकार आहात ज्यानी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप अस्वस्थ केले आहे.'

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच राम पोथिनेनीसोबतही दिसेल. तसंच, 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसणार आहे. उर्वशी थ्रिलर सिनेमा 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. तसंच साऊथचा 'थिरुट्टू पायले २' च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT