Urvashi Rautela Naseem Shah esakal
मनोरंजन

Urvashi Rautela Naseem Shah : पाकिस्तानच्या नसीमला उर्वशीच्या बर्थ डे शुभेच्छा म्हणते, 'तू मला....'

आता उर्वशी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Urvashi Rautela Naseem Shah : टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री, सेलिब्रेटी उर्वशी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतची गर्लफ्रेंड म्हणून नेटकरी नेहमीच उर्वशीला चिडवत असतात. त्यावरुन उर्वशीचा संताप होतो खरा पण नेटकऱ्यांचा, चाहत्यांचा त्या गोष्टीवर विश्वास बसेल अशा गोष्टी उर्वशीही करताना दिसते.

आता उर्वशी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तिच्यावर नेटकऱ्यांनी आगपाखडही केली आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशीनं नसीमला अनफॉलो केले होते. त्यानंतर आता पुन्हा तिनं त्याच्या बर्थ डे ला दिलेल्या शुभेच्छांनी उर्वशीच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.

Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

उर्वशीचे नेमकं काय सुरु आहे असा प्रश्न एका नेटकऱ्यानं केला आहे. तर दुसऱ्यानं तुझ्या अशा वागण्यानं तो ऋषभ पंत नाराज होण्याची शक्यता अधिक आहे. तू त्याची काळजी घेण्याऐवजी त्या नसीमशी बोलण्यात का वेळ वाया घालवते आहे असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारुन उर्वशीवर नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे उर्वशीनं नसीमला शुभेच्छा देताना त्याला काही प्रश्नही विचारले आहे.

उर्वशीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तू मला सांग की, तुझी डीएसपी पोस्टिंग काय म्हणते आहे, तुला तुझ्या नव्या नोकरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यावर नसीमनं देखील तिला धन्यवाद म्हणून प्रतिसाद दिला आहे. यासगळ्यात मात्र उर्वशीवर नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. एकदा त्याला अनफॉलो करते, पुन्हा त्याच्याशी बोलते हा काय प्रकार आहे, असे प्रश्न तिला नेटकऱ्यांनी विचारले आहेत.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर उर्वशीवर नेटकऱ्यांनी पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. तिच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी लक्ष ठेवून होते. तू ऋषभची काळजी घेण्यासाठी का जात नाही असे प्रश्न तिला विचारले होते. तिनं ऋषभसाठी इंस्टावर खास पोस्टही शेयर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT