Urvashi Rautela's mother Meera Rautela has dismissed reports about the actress moving to a new house worth ₹190 crore in Mumbai. Esakal
मनोरंजन

Urvashi Rautela: 'माझ्या मुलीबद्दल अफवा पसरवू नका', उर्वशीची आई चांगलीच भडकली! काय आहे प्रकरण

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला ही अशी सौदर्यंवती आहे जी नेहमी चर्चेचा भाग असते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मग त्याागच कारण असतं ते कधी ऋषभ पंत तर कधी तर कधी तिचा लूक तर कधी तिचे पोस्ट काहीही असो उर्वशी नेहमीच लाइमलाइटचा एक भाग राहते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून उर्वशीची चर्चा सुरु झाली ती एका बातमीमुळे. ती म्हणजे उर्वशी जुहूच्या बंगल्यात शिफ्ट झाली आहे. 190 कोटींचा बंगला खरेदी करून चर्चेत आली होती. तिच्याबद्दल अशी चर्चा होती की ती या घरात शिफ्ट झाली आहे. मात्र आता या प्रकरणावर उर्वशी रौतेलाच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला हिने आपल्या मुलीने 190 कोटींचा बंगला खरेदी केल्याच्या बातमी खोटी असल्याच सांगितलं आहे. याप्रकरणी इन्स्टंट बॉलीवूडने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये उर्वशी रौतेलाने 190 कोटींचा बंगला खरेदी केल्याची बातमी चुकीची असल्याचे सांगण्यात आले होते.

Urvashi Rautela

मीरा रौतेला यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि त्यावर थ्रोबॅक लिहिले. या लेखात लिहिले आहे की, 'उर्वशी रौतेला तिच्या 190 कोटींच्या जुहूच्या घरात शिफ्ट झाली आहे. वाचा त्याच्या चार मजली इमारतीचा तपशील…. यावर मीराने कॅप्शन देत ही बातमी चुकीची असल्याचे सांगितले होते.

त्याचबरोबर त्यांनी लिहिलं की, 'इशांअल्लाह असा दिवस लवकरच येईल...आणि सर्व वृत्तवाहिन्यांची प्रार्थना स्वीकारली जावी, आमिन.' मात्र आता त्यांनी ती पोस्ट डिलीट केली आहे.

उर्वशी बद्दल बोलायचं झालं तर तिने नुकतिच कान्स फेस्टिवलला हजेरी लावली होती. त्यावेळी तिने गळ्यात मगरीचा नेकलेस घातला होता. ज्यामुळे ती चर्चेत आली आणि बरिच ट्रोलही झाली होती.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसली. उर्वशी थ्रिलर सिनेमा 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. तसंच साऊथचा 'थिरुट्टू पायले २' च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

माधुरीचं 'हे' गाणं अश्लिल म्हणत कोर्टाने केलेलं बॅन, दूरदर्शन, रेडिओवर सुद्धा गाणं वाजवण्यास होती बंदी

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर लाठीचार्ज प्रकरण 30 अटकेत असलेल्या सर्व आरोपीना मिळाला जामीन

Kojagiri Pournima : किल्ले रायगड आजही विसरू शकणार नाही कोजागिरीशी जोडला गेलेला शिवाजी महाराजांचा इतिहास, हिरा बनली हिरकणी...

Natural Cough Relief for Children: कफ सिरपला विसरा..! घरीच बनवा लहान मुलांच्या खोकल्यावर रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT