Ustad Rashid khan passed away memories  esakal
मनोरंजन

Ustad Rashid khan passed away : पंडित भीमसेन जोशींची भविष्यवाणी राशिद खान यांनी खरी ठरवली!

आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीसाठी केवळ भारतच नाही तर जगभर ख्याती असलेले उस्ताद राशिद खान यांच्याविषयीची मोठी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Ustad Rashid khan passed away memories : आपल्या आगळ्या वेगळ्या गायकीसाठी केवळ भारतच नाही तर जगभर ख्याती असलेले उस्ताद राशिद खान यांच्याविषयीची मोठी बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या ५५ व्या अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चाहत्यांना धक्का बसला आहे. विलंबित ख्याल गायकीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या उस्ताद राशिद खान यांचा चाहतावर्ग मोठा होता.

उस्ताद राशिद खान यांच्या निधनाच्या बातमीनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. यात उस्ताद राशिद खान यांच्याविषयीच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. त्यापैकी एक आठवण म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी उस्ताद राशिद खान यांच्याविषयी केलेली भविष्यवाणी. पंडितजींनी जेव्हा उस्ताद राशिद यांना ऐकले तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी होती.

असं म्हटलं जातं की, उस्ताद राशिद खान हे उस्ताद आमिर खॉ आणि भीमसेन जोशी यांच्या गायकीनं प्रभावित झाले होते. या दोन्ही गायकांचा आणि त्यांच्या गायकीचा राशिद यांच्यावर असणारा प्रभाव त्यांच्या गायकीतून सतत जाणवायचा. त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखतीतून ही गोष्ट सांगितलीही होती. तोरे बिना मोहे चैन सारखी रचना उस्ताद राशिद खान यांनी लोकप्रिय केली होती. त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड होता.

पंडित भीमसेन जोशी आणि उस्ताद राशिद खान यांचा एक प्रसंग हा नेहमीच सांगितला जातो. पंडितजींनी जेव्हा राशिद यांचे गाणे ऐकले तेव्हा ते म्हणाले होते की, उत्तर भारतीय संगीत विश्वातील मोठं नाव कमावण्याची ताकद राशिद खान यांच्यात आहे. आणि ते त्यांची वेगळी ओळख तयार करतील यात कोणताही शंका नाही. उस्ताद राशिद खान यांनी पंडितजींचे ते शब्द खरे करुन दाखवले.

एका मुलाखतीमध्ये उस्ताद राशिद खान यांनी पंडित भीमसेन जोशी यांच्याविषयीची खास आठवण सांगितली होती. ते म्हणाले, मला साक्षात पंडितजींसोबत गाण्याची संधी मिळाली, आमची जुगलबंदी चांगलीच रंगली. त्यावेळी पंडितजींनी उस्ताद राशिद खान यांचे कौतुक केले होते. एवढेच नाही तर पंडितजी साताऱ्याहून उस्ताद राशिद खान यांच्यासाठी खास विड्याची पानंही पाठवायचे. असे राशिद खान यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले होते.

रामपूर सासवान घराण्याचे प्रसिद्ध गायक म्हणून राशिद खान यांच्याकडे पाहिले गेले. त्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शास्त्रीय संगीताची सेवा करत आपल्या गायकीतून प्रचंड लोकप्रियता मिळवली. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गायन केले होते. त्यात जब वी मेट मधील 'आओगे जब तुम साजना' नावाची बंदिश लोकप्रिय ठरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : माझ्यामुळेच भारत अन् पाकिस्तानचे अणुयुद्ध टळले; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Latest Maharashtra News Updates : गणेशोत्सवानिमित्त गावाकडे जाण्यासाठी कोकणवासीयांची स्वारगेट बस स्थानकात मोठी गर्दी

Ganesh Festival 2025: गणेशोत्‍सवासाठी तगडा बंदोबस्‍त; पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ जवानांसह साडेआठ हजार जण तैनात

Ajit Pawar : रक्षाबंधन झाले आता भाऊबीज होईल, अजित पवारांचा शब्द; मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन! 'सोलापुरातून २५ हजार वाहने निघणार मुंबईकडे'; आझाद मैदानावर समाजबांधवांचे वादळ धडकणार

SCROLL FOR NEXT