Rashid Khan Hospitalised: Esakal
मनोरंजन

Rashid Khan Hospitalised: गायक राशिद खानची प्रकृती चिंताजनक! रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांना दक्षिण कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Vaishali Patil

Rashid Khan Hospitalised: मनोरंजन विश्वातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक राशिद खान यांना शनिवारी दक्षिण कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 55 वर्षीय राशिद खान हे पुर्वी कर्करोगाने ग्रस्त असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्टनुसार, राशिद खान यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, आजारी असूनही त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत विशेषत: शास्त्रीय संगीताच्या दैनंदिन सरावात फारसा बदल झाला नाही.

त्यांचा दिनक्रम पहाटे 4 वाजता सुरू होतो. राशिद खान यांनी फक्त 11 वर्षांचे असताना त्यांच्या संगीत कारकिर्दीला सुरुवात झाली. जरी प्रामुख्याने शास्त्रीय गायक म्हणून प्रसिद्ध असले तरी रशीद खानच्या फ्यूजन आणि चित्रपट गाण्यानाही प्रशंसा मिळाली आहे.

रशीद यांनी अनेक बंगाली गाणी गायली आहेत आणि 'तोरे बिना मोहे चैन नहीं' आणि 'आओगे जब तूम' या लोकप्रिय बॉलीवूड गाण्यांना त्यांनी आवाज आहे.

'माय नेम इज खान', 'राज 3', बापी बारी जा', 'कादंबरी', 'शादी मैं जरूर आना', 'मंटो' और 'मीटिन मास' यांसारख्या हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी गायली आहेत. ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.

उस्ताद रशीद खान वयाच्या 14 व्या वर्षी ITC मध्ये रुजू झाले. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. राशिद खान यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय संगीत नाट्य अकादमी, इंडियन म्युझिक अकादमी आणि महान संगीतकार इत्यादी पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : भर पावसात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

SCROLL FOR NEXT