vaalvi movie world television premiere on zee marathi 18 june 2023 cast swapnil joshi anita date shruti surve subodh bhave sakal
मनोरंजन

Vaalvi Movie: आता घरबसल्या मोफत पाहा वाळवी चित्रपट.. कधी? कुठे? आणि कसा? पाहा एका क्लिक वर..

बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेला वाळवी आता घरबसल्या पाहा..

नीलेश अडसूळ

झी मराठीच्या सोशल मीडिया पेज वर एक पोस्ट वायरल होतेय ते म्हणजे ''नवा गडी नवं राज्य' चा राघव अचानक काहीतरी वेगळच असंबंध बोलतोय आणि वागतोय. त्याच्या घरातील टीव्ही ची तो जिवा पलीकडे काळजी घेतो आहे, तो घरातील कोणालाच टीव्ही ला हात सुद्धा लावू देत नाही आहे.

राघव आपली बहीण वर्षा हिला सुद्धा टीव्ही लावू नको असा बजावतो आणि ह्या त्याच्या वागण्याचे वर्षा कारण विचारते, तर तो असे काहीतरी सांगतो कि वर्षा सुद्धा गहन विचारात पडते. परत वर्षा राघवला टीव्ही न लावायचं कारण विचारते तेव्हा राघव मोठ्या काळजी ने सांगतो कि टीव्हीला जपायला हवे कारण टीव्ही ला वाळवी लागणार आहे. हा प्रोमो सध्या बराच व्हायरल होत आहे.

(vaalvi movie world television premiere on zee marathi 18 june 2023 cast swapnil joshi anita date shruti surve subodh bhave)

झी स्टुडिओज निर्मित 'वाळवी' चित्रपटाने (Marathi Movie) बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला, आणि आता लवकरच म्हणजे येत्या १८ जूनला, संध्या. ७ वाजता त्याचा ‘वर्ल्ड टीव्ही प्रीमियर’ झी मराठी वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. परेश मोकाशी दिग्दर्शित ह्या चित्रपटात ‘स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव’ हे प्रमुख भूमिकेत आहेत.

लाकडाला वाळवी लागली तर ती लाकूड पोखरून काढते ह्याचा प्रकारे जर नात्यानं वाळवी लागली तर काय होते हे प्रेक्षकांना बघायला मिळेल. शेवट पर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा आणि अनेक गुपितं दडवून असलेला हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असेल.

यापूर्वी झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी मराठी सिनेसृष्टीला हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का. असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आता घरात लागलेली 'वाळवी' ही प्रेक्षकांचं मनोरंजन करणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : लातूरच्या खाजगी शाळांमध्ये पालकांची लूट

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT