Vaani Kapoor News Instagram
मनोरंजन

Vaani Kapoor: मुंबईत वर्सोवा ते बान्द्रा दरम्यान वाणीसोबत घडली अंगाचा थरकाप उडवणारी घटना..एका सडकछाप गुंडानं..

वाणी कपूरनं आपल्या सोबत घडलेल्या त्या भीतीदायक घटने संदर्भात वर्सोव पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.

प्रणाली मोरे

Vaani Kapoor News: डोक्यात प्रेमाचं भूत घेऊन मुलींना उगाचच छळणाऱ्या सडकछाप गुंडांची काही कमी नाही. हे असे लोक कोणतीही हद्द पार करू शकतात ज्यानं जीवावर देखील बेतू शकतं. अशाच एका सडकछाप गुंडाचा अनुभव अभिनेत्री वाणी कपूरला आला आहे.

रस्त्यावर अशीच टवाळखोरगिरी करणाऱ्या गुंडानं अभिनेत्री वाणी कपूरचा पाठलाग केला होता. तो माणूस खूपच जिद्दी होता आणि त्यानं १० किलोमीटरपर्यंत वाणी कपूरचा पाठलाग केला. प्रकरण मुंबईतलं होतं.

वाणी कपूरच्या गाडीच्या ड्रायव्हरला त्या सडकछाप गुंडापासून वाणीची सुटका करण्यासाठी गाडीला खूप पळवावं लागलं. वाणी कपूर देखील या गोष्टीनं खूप घाबरली होती. पुढे जाऊन कळालं तो वाणीचा म्हणे फॅन होता.

अनेकदा सेलिब्रिटींना अशा विचित्र चाहत्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. शाहरुख खानसोबतही काही दिवसांपूर्वी असेच झाले.

चला,वाणी कपूर सोबत नेमकं या सडकछाप गुंड प्रवृत्तीच्या चाहत्यामुळे काय घडलं होतं ते जाणून घेऊया.(Vaani kapoor crazy man followed her in mumbai bike incident police case)

वाणी कपूर आपल्या कारमधून मुंबईतील वर्सोवा येथून बान्द्र्याला चालली होती. अभिनेत्रीची गाडी तिचा ड्रायव्हर चालवत होता. काही वेळानंतर नोटीस केलं गेलं की एक माणूस बाईकवरनं वाणीच्या गाडीचा पाठलाग करत आहे. त्या माणसाचं नाव होतं समीर खान.

तो माणूस गाडीचा पाठलाग करत आहे हे लक्षात येताच वाणी कपूरच्या ड्रायव्हरने गाडी खूप वेगात पळवायला सुरुवात केली. पण याचा काही फायदा झाला नाही. तो बाईक रायडरही वाणीच्या गाडीचा तितक्याच वेगानं पाठलाग करत होता.

पण काही किलोमीटर हा गाडी पळवण्याचा खेळ चालल्यानंतर वाणीची गाडी पुढे निघून गेली. आणि तो माणूस खूप मागे राहिला.

हेही वाचा: बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

पण जशी वाणी बान्द्राहून निघाली तेव्हा पुन्हा त्या माणसानं तिच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्याला वाणीशी बोलायचे होते आणि तो हट्टच धरून बसला. प्रकरण तसं गंभीर होत.

कसंबसं वाणीनं त्याच्यापासून आपला पिछा सोडवला पण तिच्या मनात त्या माणसाविषयीची भीती कायम राहिली. वाणीनं याबाबतीत पोलिसांची मदत घेण्याचं ठरवलं.

तिनं नंतर वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकरणाची तक्रार दाखल केली आणि तेव्हा कुठे ती थोडी निवांत झाली.

वाणीच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर वाणी कपूरनं २०१३ मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत 'शुद्ध देसी रोमान्स' सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती 'बेफिक्रे', 'वॉर','बेलबॉटम' सारख्या सिनेमात दिसली. रणबीर कपूर सोबत काही दिवसांपूर्वी ती आपल्याला 'शमशेरा' सिनेमात दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT