Vaibhavi Upadhyaya Esakal
मनोरंजन

Vaibhavi Upadhyaya: 'तिला जगायचं होत', अपघातानंतर वैभवी स्वतःला वाचवण्यासाठी केली होती धडपड, पोलिसांचा खुलासा

Vaishali Patil

Vaibhavi Upadhyaya Death: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम वैभवी उपाध्याय हिचा 23 मे रोजी अपघाती मृत्यू झाला. तिनं लहान वयातच जगाचा निरोप घेतल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.

वैभवी तिच्या प्रियकरासोबत त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅलीला जाणार होती. त्याचवेळी बंजारजवळील सिधवा येथे त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन 50 फूट खोल दरीत कोसळली आणि वैभवीवर काळानं घाला घातला.

तिच्या मृत्यूनं सोशल मीडियावरील चाहते अजूनही सावरलेले नाहीत. आता हिमाचलमधील कुल्ली पोलिसांनी या भीषण कार अपघाताची पुर्ण माहिती दिली आहे.

अपघातानंतर वैभवी तिचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याचं त्यांनी सांगितलं. तिने सर्वतोपरी प्रयत्न केले पण डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं ती वाचू शकली नाही अन् तिला जीव गमवावा लागला असंही त्यांनी सांगितलं.

कुल्लूचे पोलीस अधीक्षक साक्षी वर्मा यांनी सांगितले की वैभवी कार अपघातातून कशी वाचण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होती. वैभवी कारच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ती तसं करू शकली नाही आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

एसपींनी आपल्या निवेदनात म्हटले आहे- "वैभवीला कारच्या खिडकीतून बाहेर पडायचं होतं, परंतु तिच्या डोक्याला दुखापत झाली, जी प्राणघातक ठरली." तिला बंजार येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले. यात तिचा प्रियकरही जखमी झाला आहे.

कामातून सुट्टी घेऊन वैभवी आणि तिचा प्रियकर दोघे हिमाचलला फिरायला गेले. कुल्लूच्या बंजार भागातील सिधवानजवळ एका कार अपघातात तिचा मृत्यू झाला. वैभवीच्या कारला ट्रकने धडक दिली. वैभवीने सीट बेल्ट घातला नसल्याने डोक्याला मार लागल्याने व जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

जस्मिनच्या भूमिकेतुन घराघरात पोहचलेल्या वैभवीने यावर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर वैभवीने जय गांधींसोबत एंगेजमेंट केली होती. डिसेंबरमध्ये दोघांचे लग्न होणार होते. 24 मे ला बोरवलीत तिच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT