Vaishali Thakkar Suicide 
मनोरंजन

Vaishali Thakkar Suicide: वैशालीचा आरोपी राहुलची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी...

कोर्टाने पोलिसांना फटकारले....

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने 15 ऑक्टोबर रोजी इंदूरच्या राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येने टिव्ही इंडस्ट्रीसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.  तिच्या आत्महत्येनंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या डायरीने अनेकांची पोल खोलली.

 वैशालीने तिच्या सुसाइड नोटमध्ये राहुलवर गंभीर आरोप केले होते. तिने म्हटले होते की, मैत्रीचा गैरफायदा घेत राहुलने तिचे काही फोटो क्लिक केले आणि ते फोटो तिच्या प्रियकराला पाठवून तिचे लग्न मोडले. तिला आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्याविषयी तिने यात उल्लेख केला होता. त्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि कोर्टासमोर हजर केले.

 वैशालीचा माजी प्रियकर राहुल नवलानी याचे नाव समोर आल्यानतंर त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला होता. राहुल गेल्या अडीच वर्षांपासून तिचा छळ करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.  तिने सुसाईड नोटमध्ये तिच्या मृत्यूसाठी राहुलला जबाबदार धरले होते. वैशालीने आत्महत्या केल्यानंतर राहुल फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तीन दिवसांनी शोध घेतल्यानंतर छापा टाकून अखेर १९ ऑक्टोबर रोजी त्याला अटक केली. पोलिसांनी राहुलला इंदूर न्यायालयात हजर केले.

  पोलिसांनी राहुलला ऑनलाइन कोर्टात हजर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांना कोर्टाने फटकारले. त्यानंतर 10 मिनिटांत राहुलला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी राहुलच्या 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी कोर्टाकडे केली, मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत राहुलला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.  आता राहुलविरुद्ध पुरावे सादर करण्यासाठी चार दिवसांचा वेळ कोर्टाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT