Vanita Kharat made a 'ha' resolution on her first Gudi Padwa after marriage SAKAL
मनोरंजन

Vanita Kharat: लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्याला वनिता खरातने केला 'हा' संकल्प

लॉकडाऊनमध्ये सुमित आणि वनिताची प्यारवाली लव्हस्टोरी जुळली.

Devendra Jadhav

Vanita Kharat News: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात ही कायम चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचं काहीच दिवसांपूर्वी लग्न झालं. वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे सोबत लग्न केलं.

वनिताच्या लग्नाला महाराष्ट्राची हास्यजत्रातील सर्व कलाकार उपस्थित होते. वनिता लग्नानंतर पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने वनिताने एक खास संकल्प केलाय.

वनिताने सकाळशी बोलताना हा खुलासा केलाय. वनिताने लग्नानंतरच्या पहिल्या गुढीपाडव्याला खुलासा केला कि.. येणाऱ्या वर्षात खूप काम करायचंय. आणि खास करून खूप झाडे लावायची आहेत. नवीन वर्षात माझा एक नवीन सिनेमा आहे.

त्याची माहिती मी सोशल मीडियावरून प्रेक्षकांना देईनच. आणि त्याचसोबत एक नवीन नाटक सुद्धा प्लॅन करायचा विचार आहे.. असा खुलासा वनिताने केलाय.

रोहित शेट्टीच्या पहिल्या मराठी सिनेमात म्हणजेच स्कुल, कॉलेज आणि लाईफ सिनेमात वनिता खरात झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला.

याशिवाय जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या सरला एक कोटी सिनेमात वनिता खरात झळकली. लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करण्यासाठी वनिता खरात उत्सुक आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात काल २ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. वनिता खरातने एकदम थाटामाटात नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न केलं.

हास्यजत्रातील पृथ्वीक प्रताप आणि नम्रताचा नवरा योगेश संभेराव यांनी वनिताला लग्नात उचललं होतं. वनिताने एकदम झक्कास पद्धतीने सुमीतच्या गळ्यात वरमाला घातली.

पण वनिताचा सहकलाकार आणि तिचा खास मित्र ओंकार भोजने मात्र गैरहजर होता. अनेकांना वाटलं ओंकारने हास्यजत्रा सोडल्याने वनिताने रागात त्याला बोलावलं नाही. पण लग्नानंतर ओंकार वनिताला भेटायला तिच्या घरी गेला.

वनिता खरात अभिनेत्री आहे हे सर्वांना माहीतच आहे.. पण वनिताचा सुमित काय करतो? सुमित हा आधी इव्हेंट मॅनेजमेंट करायचा.

याशिवाय सध्या तो डिजिटल सर्व्हिस प्रोव्हायडरचं काम करतो. थिएट्रिकल या संस्थेचा तो फाउंडर आणि सी.ई.ओ आहे. लॉकडाऊनमध्ये सुमित आणि वनिताची प्यारवाली लव्हस्टोरी जुळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT