Vanita Kharat posing hot photo calendar shoot says this is the form we are born  
मनोरंजन

'आईला हॉट फोटो शुट केल्याचे सांगितलं होतं' ; वनितानं सांगितला अनुभव 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - वनिता आता भलतीच चर्चेत आली आहे. त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी तिनं केलेलं हॉट फोटोशुट. चित्रपटातून नव्हे तर सोशल एका कँलेडरसाठी केलेल्या हॉट फोटो सेशनसाठी ती कमालीचे लोकप्रिय झाली आहे. त्यावरुन ट्रोलही झाली आहे. मात्र त्याची तिला पर्वा नाही. आपण जे काही केलं त्याची माहिती घरी दिली होती. त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष देत नसल्याचे तिनं सांगितले आहे.

शाहिद कपूरच्या कबीर सिंग चित्रपटात कबीरच्या घरात मोलकरणीचं काम करणारी भूमिका वनितानं साकारली होती. तिनं नुकतेच एका कॅलेंडरसाठी हॉट फोटोशुट केलं आहे. ते फोटोशुट अनेक गोष्टींना तोंड फोडणारे आहे. जे कोणी महिलांना त्यांच्या कपड्यांमुळे वेगवेगळी लेबल्स लावत असतील त्यांना वनितानं चांगलचं सुनावले आहे. मुळची मुंबईतील वरळी येथे राहणा-या वनितानं आपल्या अशाप्रकारच्या फोटोशुट मधून  'बॉडी पॉझिव्हिटीचा' संदेश दिला आहे. अंगप्रदर्शन करुन प्रस्थापित संस्कृतीरक्षकांना खडे बोल सुनावणा-यांची संख्या मोठी आहे. यात अनेक सेलिब्रेटींचा सहभाग आहे.

जगातील महासत्ता म्हणून गणल्या जाणा-या कित्येक देशांमध्ये अद्याप स्त्री आणि तिची वेशभुषा यावरुन सतत चर्चा होत असते. आता यासगळ्यावर सणसणीत उत्तर अभिनेत्री वनिता खरात हिनं दिलं आहे. तिचं हॉट फोटोशुट कमालीचं व्हायरल झालं आहे. 
वनितानं  ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपण ज्यावेळी हॉट फोटोशुट केले तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती त्याबाबत सांगितले आहे. ती म्हणाली, जेव्हा मी फोटोशूट केलं तेव्हा खूप भीती वाटत होती. कारण मी चाळीत राहणारी मुलगी आहे. त्यामुळे माझ्या शेजारी राहणारे, माझे कुटुंबीय कशी प्रतिक्रिया देतील मला माहिती नव्हतं. मी घरी काहीही सांगितले नव्हते.  जे काय करत होते तेव्हा घाबरले होते. एवढं मात्र नक्की. दुसऱ्यांकडून कळण्याआधीच मी घरी फोटोशुटबद्दल सांगितले होते’. 

वनितानं सोशल मीडियावर ते हॉट फोटो शेयर केले आहेत. त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले आहे. तर काहींनी तिच्या अशाप्रकारच्या नव्या भूमिकेचे कौतूकही केले आहे. इंस्टावरील त्या हॉट फोटोशुटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण जसे आहोत तसे आहोत. जे शरीर आपल्याकडे आहे त्याविषयी आपल्याला अभिमान असायला हवा. त्याबाबत कुणाची भीती बाळगण्याची काहीच कारण नाही. जे कुणी इतरांच्या दबावाला बळी पडत असतील त्यांनी तसे करु नये. असे वनितानं म्हटलं आहे. 
 वनिता पुढे म्हणाली, ज्यावेळी मी माझ्या आईला सांगितलं की एका कॅलेंडरसाठी मी  हॉट फोटोशूट केलं तेव्हा आई ठिक आहे असं म्हणाली. काही हरकत नाही. तो तुझ्या कामाचा भाग आहे. ते ऐकून मला दोन मिनिट वाटलं ही खरच माझी आई आहे ना जी काही वर्षांपूर्वी या क्षेत्रात जाण्यापूर्वी एकदा विचार कर असं मला म्हणत होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT