varun dhawan 
मनोरंजन

अभिनेता वरूण धवन आर्थिक मदत केल्यानंतर आता करणार डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफसाठी मोफत भोजनाची व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढता संसर्ग पाहता त्याचा सामना करण्यासाठी नामवंत चेहरे समोर येत आहेत.  एकूणच सरकारला मदत करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. यामध्ये अनेक कलाकारांचा देखील समावेश आहे.. यामध्ये कोणी आर्थिक मदत करत आहे तर कोणी अन्न-धान्य आणि खाद्य पदार्थांची मदत करत आहेत. याशिवाय काहींनी आपले हॉटेल, ऑफिस डॉक्टर, नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी क्वारंटाईन सेंटर म्हणून दिले आहे. या साखळीमध्ये आता अभिनेता वरूण धवनचं नाव देखील पुढे आलं आहे.

याआधीही वरुणने पंतप्रधान सहाय्यता निधी साठी ३० लाखांची मदत केली आहे. ही मदत केल्यानंतर वरूण आता रूग्णालयात दिवसरात्र काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व मेडिकल स्टाफसाठी आणि ज्यांना सध्याच्या काळात नोकरी नाही यांच्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था करणार आहे.याची माहिती त्याने त्याच्या सोशल अकाऊंटवर  एक अधिकृत पत्र शेअर करत दिली आहे.

यामध्ये तो म्हणाला की, 'लॉकडाऊनदरम्यान मी प्रत्येक दिवशी पाहतो की जे लोक घरापासून लांब राहून आपल्या देशाला संकटातून वाचवण्यासाठी काम करत आहेत ते फारच कौतुकास्पद आहे. जे लोक घरापासून लांब आहेत आणि या संकटात ज्यांच्याकडे सध्या नोकरी नाही त्यांच्यासाठी मी मोफत भोजनाची व्यवस्था करणार आहे. जे लोक संकटातून बाहेर येण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत ते डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल स्टाफसाठी देखील मी मोफत भोजनाची व्यवस्था करत आहे.

खरंतर माझ्याकडून ही छोटी मदत आहे पण आत्ताच्या घडीला छोट्यातली छोटी मदत देखील गरजेची आहे. हे सगळं भोजन 'ताज पब्लिक सर्व्हिस वेलफेअर ट्रस्ट' यांच्या मदतीने पोहचवली जाणार आहे. यापुढेही माझ्याकडून जितकी मदत करता येईल तितकी मदत मी करेन.'

वरुणने केलेल्या या मदतीसाठी सर्वांकडून त्याचे फारच कौतुक होताना दिसत आहे.  

varun dhawan to provide meals to doctors and medical staff at hospitals  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT