arun 
मनोरंजन

#VijayDiwas हुतात्मा अरुण खेत्रपाल यांच्या शौर्यगाथेवर येतोय चित्रपट, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

वृत्तसंस्था

मुंबई : आजचा दिवस हा विजय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. आजच्या दिवशी १९७१ मध्ये भारत-पाक युद्धात भारताने पाकिस्तानावर विजय मिळवला हाेता. आपल्या वीर सैनिकांच्या पुढे याच दिवशी ९३,००० पाक सैनिकांनी गुडघे टेकले होते. हीच शौर्यगाथा आता पडद्यावर दिसणार आहे.

दरम्यान, बॉलिवूडचे निर्माते यावर चित्रपट करू इच्छित आहेत. या कामाची जबाबदारी दिग्गज दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी घेतली आहे. या चित्रपटात शहीद परमवीर चक्र विजेते लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांची कथा दाखवण्यात येणार आहे. शिवाय यात १९७१ मधील युद्ध दाखवण्यात येणार आहे. यासाठी राघवन यांनी वरुण धवनला मुख्य भूमिकेत घेतले आहे. तो यात खेत्रपाल यांची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाची कथा १९७१ च्या भारत-पाक युद्धावर असल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू होती. मात्र हा चित्रपट सेकंड लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल यांचा बायोपिक असल्याचे दिनेश व्हिजन यांनी स्पष्ट केले.

वरुण या चित्रपटात अरुण खेत्रपाल यांची भूमिका साकारणार आहे. २१ वर्षाचा दिसण्यासाठी त्याला मेहन घ्यावी लागणार आहे. शिवाय तो लष्कराच्या अधिकाऱ्याकडून सैनिकी प्रशिक्षणदेखील घेणार आहे.

अतुलनीय वीरगाथा- अरुण सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळवणाारे अधिकारी होते. १९७१ मध्ये बासंतारच्या युद्धामध्ये पाकिस्तानकडे ५ बटालियन हाेते आणि भारताकडे फक्त तीन बटालियन होते. ३ टँक घेऊन पुण्याचे हॉर्स सेकंड लेफ्निनेंट अरुण यांना समोरुन येणाऱ्या पाकिस्तानी लान्सर्सच्या पॅटन टँक्सची लाइन थांबविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. 21 वर्षीय अरुणने समोरून येणाऱ्या स्क्वाड्रॅनला धडक दिली. त्यांनी पाकिस्तानी सैन्याचे मनोबल तोडले होते. त्यांच्या शौर्याचे कथा पाकिस्तानी डिफेन्सच्या वेबसाइटवर बरेच दिवस झळकत हाेती. पाकिस्तानी ब्रिगेडियरसुद्धा त्यांच्या धाडसाने प्रभावित झाले होते.

या बाबत निर्माता दिनेश विजन म्हणाले, ''अरुणच्या शौर्य आणि जिवंतपणाचे बरेच किस्से आहेत.‘ त्यावर रिसर्च वर्क सुरू आहे. याशिवाय ते असा चित्रपट तयार करत आहेत, ज्याचे नाते देशाच्या अभिमानाशी आहे. यातच कलाकारांच्या वेशभूषेपासून ते नियम, कायदे, िशस्त यावर सहा महिने लागतील.''

‘श्रीराम राघवन म्हणाले, ‘भारतीय सेनेवर ज्यावेळी कुणीही चित्रपट तयार करतो ते खूप जबाबदारीचे काम असते, आणि विशेषत: अशा एका व्यक्तीवर जे देशासाठी शहीद झाले. तर आम्हाला याकडे विशेष लक्ष ठेवावे लागेल की त्यांची आर्मीसंबंधी जी काही माहिती असेल ती योग्य असावी.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT