Ved on Television starring riteish deshmukh genelia deshmukh world premier Star Pravah on this date  SAKAL
मनोरंजन

Ved on Television: सगळ्यांना 'वेड' लावणारा सिनेमा आता स्टार प्रवाहवर, या तारखेला होतोय प्रिमीयर

अनेकजण वेड टीव्ही वर कधी येतो याची वाट पाहत होते

Devendra Jadhav

Ved on Television:  रितेश देशमुख - जिनिलिया देशमुख यांचा वेड सिनेमा संपुर्ण प्रचंड गाजला. वेड प्रदर्शित होऊन आता सात महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटला असला तरीही वेड ची क्रेझ काही कमी झाली नाही.

वेडने बॉक्स ऑफीसवर कमाईचा आकडा मोडला. नुकतीच रितेश - जिनिलियाच्या वेड बद्दल एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे मराठी प्रेक्षकांना नक्कीच आनंद होईल. अनेकजण वेड टीव्ही वर कधी येतो याची वाट पाहत होते.

(Ved on Television starring riteish deshmukh genelia deshmukh world premier Star Pravah on this date)

वेड टीव्हीवर

वेड सिनेमात रितेश - जिनीलीया सोबत अशोक सराफ, विद्याधर जोशी, जिया शंकर अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. वेड ने सगळ्या महाराष्ट्राला वेड लावलं. वेड आता टेलिव्हिजनवर कधी येतोय याची सर्वजण वाट पाहत होते.

अखेर वेडचा टीव्ही प्रिमीयरची रिलीज डेट समोर आलीय. वेडचा आता टेलिव्हिजनवर वर्ल्ड प्रिमियर होतोय. 20 ऑगस्टला संध्याकाळी वाजता वेड प्रेक्षकांना घरबसल्या स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

वेड कोणत्या OTT वर?

वेड काही महिन्यांपुर्वी Hotstar वर रिलीज झालाय. रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून हि माहिती सर्वांसोबत शेयर केली . त्यामुळे प्रेक्षकांना खुप आनंद झालाय. आणखी एक खास गोष्ट म्हणजे वेड मराठी सोबतच हिंदी मध्ये सुद्धा हॉटस्टार वर पाहायला मिळतोय.

वेड All Time Blockbuster

वेड सिनेमाने थिएटरमध्ये १०० दिवस पूर्ण केले आहेत. All Time Blockbuster झालेल्या वेडने यशस्वी १०० दिवस पूर्ण केले होते.

वेडनेस कोणीही थांबवू शकत नाही.. तुमच्या प्रतिसादासाठी खूप आभार.. आमच्याकडे शब्दच नाहीत.. अशा शब्दात रितेशच्या मुंबई फिल्म कंपनीने प्रेक्षकांचे आभार मानले होते.

वेडची कमाई

१०० दिवस पूर्ण करून वेड ने कमाईत सुद्धा बाजी मारली आहे. वेडने बॉक्स ऑफीसवर ७४ कोटींचा टप्पा पूर्ण केलाय. जगभरात वेडने ७४ कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून भारतात वेडने ६०. ६७ कोटींची कमाई केली आहे.

अशाप्रकारे सैराटनंतर वेड सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. वेड निमित्ताने मराठी सिनेमांची नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात झाली. आता काहीच दिवसांपुर्वी रिलीज झालेला बाईपण भारी देवा सिनेमा वेडची बॉक्स ऑफीस कमाई मोडणार असं दिसतंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT