zara khan receives rape threat 
मनोरंजन

सलमा आघा यांची मुलगी झाराला सोशल मिडीयावर बलात्काराची धमकी, आरोपी अटकेत

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- दिग्गज अभिनेत्री आणि गायिका सलमा आघा यांची मुलगी झारा खानला सोशल मिडियावर अश्लील मेसेज आणि बलात्काराची धमकी मिळाली आहे. झारा खानने मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराची धमकी मिळाल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. झाराने तिच्या तक्रारीमध्ये म्हटलंय की तिला इंस्टाग्रामवर सतत धमक्या दिल्या जात आहेत. तिला सतत अश्लिल मेसेज पाठवले जात होते. इतकंच नाही तर तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी देखील दिली गेली होती ज्यानंतर झाराने मुंबईत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

झाराने तिच्या तक्रारीमध्ये सांगितलं की तिला २८ ऑक्टोबर पासून ते ३ नोव्हेंबर दरम्यान अनोळख्या व्यक्तीने बलात्काराची धमकी देत आहे. झाराने ६ नोव्हेंबरला एका महिलेच्या विरोधात धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. ही महिला हैद्राबाद येथील २३ वर्षीय एक एमबीए विद्यार्थिनी आहे. असं म्हटलं जातंय की या विद्यार्थिनीने झाराला धमकी देण्यासाठी इंस्टाग्रामवर एक फेक प्रोफाईल बनवली होती ज्यावरुन ती झाराला मेसेज करुन त्रास देत होती. 

झाराच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीचा छडा लावला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, तपास अधिका-यांनी तक्रारीनंतर याबाबतची माहिती सायबर सेलला दिली. त्यानंतर सायबर सेलने लोकल आयपी ऍड्रेसचा शोध घेतला आणि आरोपीपर्यंत पोहोचले. झारा खानने 'औरंगजेब' आणि 'देसी कट्टे' यांसारख्या सिनेमात केलं आहे.   

veteran actress salma agha daughter zara khan receives rape threat on social media  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT