veteran actress sulochana latkar worship some coins money given by a beggar sakal
मनोरंजन

Sulochana Didi: भिकाऱ्याने दिलेल्या 'त्या' वस्तूची सुलोचना दीदींनी आयुष्यभर पूजा केली.. वाचा खास किस्सा..

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या आयुष्यातील हा प्रसंग फारच कलाटणी देणारा ठरला..

नीलेश अडसूळ

Sulochana didi passed away: अवघ्या मनोरंजन विश्वाच्या सुलोचना दीदी.. म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.

त्यांच्या निधनानंतर अनेक दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केल्या आहेत. सोशल मिडियावर देशील अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. बॉलीवुडमधूनही त्यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या जात आहेत.

सुलोचना दीदी यांनी केवळ आईची भूमिका केल्या नाही तर संपूर्ण मनोरंजन विश्वाला त्यांनी आईची माया लावली. म्हणूनच त्यांच्या जाण्याने मोठ्याप्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या माणूस म्हणूनही प्रचंड मोठ्या होत्या, हाच त्याचा दाखला..

असाच एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडला. सुलोचना दीदी यांनी चक्क भिकाऱ्याने दिलेली वस्तु आयुष्यभर जपली. नेमका काय आहे हा प्रसंग, जाणून घेऊया..

(veteran actress sulochana latkar worship some coins money given by a beggar)

आपल्याला जर एखाद्या भिकाऱ्याने काही दिलं तर आपण ते घेऊ का? आणि घेतलं तरी त्यात नाना शंका काढू.. पण असाच एक किस्सा सुलोचना दीदींच्या बाबतीत घडला होता. जे भिकारी इतरांकडे पैसे मागून पोट भरतात, अशाच एका भिकाऱ्याने चक्क सुलोचना दीदींना पैसे दिले होते.  

एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितलं होता. त्या म्हणाल्या होत्या की, ''सांगते ऐका' चित्रपटाचा रौप्य महोत्सव होता. तेव्हा खूप दिग्गज कलाकार आले होते. पुण्यातले सगळेच मराठी कलाकार तिथे उपस्थित होते.'

'ग. दि. माडगूळकर तिथे आले तेव्हा एका माणसाने त्यांच्या हातात काहीतरी दिलं. कार्यक्रम सुरू झाला. माडगूळकर सगळ्यांबद्दल बोलत होते. सगळ्यांची ओळख करून देत होते. नंतर माडगुळकर म्हणाले, माझ्या मुठीत काहीतरी आहे जे सुलोचना बाईंसाठी आहे.'

पुढे ते म्हणाले, ''हे काहीतरी ११- १२ आणे आहेत. मी ते सुलोचना बाईंना देतो. मला असं वाटतं त्यांनी ते खर्च करू नयेत. त्यांनी याची पूजा करत राहावी. कारण ते पैसे एका भिकारी माणसाने दिले आहेत.'

'तो भिकारी म्हणाला की, हे पैसे तुम्ही सुलोचना बाईंना द्या. मला त्यांचं काम खूप आवडलं आहे म्हणून हे त्यांच्यासाठी.. असं म्हणत त्याने ते पैसे दिले होते.'

सुलोचना दीदींच्या आयुष्यातील ही एक सगळ्यात वेगळी आणि मोठी दाद ठरली. त्यांनी माडगूळकराचं म्हणणं ऐकलं आणि आयुष्यभर त्या पैशांची पूजा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT