Zara Hatke Zara Bachke vicky kaushal and sara ali khan arrived to seek the blessings of ganpati bappa at siddhivinayak temple photo viral  Esakal
मनोरंजन

Zara Hatke Zara Bachke: ट्रोल झाल्यानंतर सारा पुन्हा सिद्धिविनायक मंदिरात! चित्रपटाच्या यशानंतर घेतले गणरायाचे दर्शन ..

Vaishali Patil

2 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. जरा हटके जरा बचकेमध्ये विकी आणि सारा यांनी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे. या जोडीची केमिस्ट्री चाहत्यांना खुप आवडली आहे. या चित्रपटानं 30 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

त्यातच आता पुन्हा विकी अन् सारानं असं काही केल आहे की त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच कौतुक केलं आहे. चित्रपटाला मिळालेल्या भरपुर सारा आणि विकी आशीर्वाद घेण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले.

सारा अली खान आणि विकी कौशल यांनी सिद्धिविनायक मंदिरातील त्यांचे काही फोटो त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. जे सोशल मिडियावर व्हायरलही झाले.

साराने फोटो शेयर करत लिहिले की, "गणपती बाप्पा मोरया... सर्व गोष्टींसाठी धन्यवाद...शुभ मंगल". तर विकीने हे फोटो शेयर करत लिहिले की, "मंगलमूर्ती मोरया! धन्यवाद बाप्पा!".

विकी कौशल आणि सारा अली खानचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये विकी आणि सारा सिद्धिविनायक मंदिराचा प्रसाद वाटताना दिसत आहेत. सारा विकीने चित्रपटाच्या प्रमोशनवेळी देखील अनेक मंदिरांना भेटी दिल्या होत्या.

तिचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सारा ट्रोलही झाली होती.

साराने त्यावेळी सारानं ट्रोल करणाऱ्यांना चांगलच सुनावलं होत. मीडियाला तिने सांगितले की, 'मी हे प्रामाणिकपणे सांगितले आहे आणि पुन्हा सांगेन की मी माझे काम खूप गांभीर्याने घेते.

मी लोकांसाठी, तुमच्यासाठी काम करते. मी अजमेर शरीफला ज्या श्रद्धेने जाते त्याच श्रद्धेने महाकाल मंदिरात जाते आणि मी जात राहीन.

चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत सुमारे 30 कोटींची कमाई केली आहे. 'जरा हटके जरा बचके' ने पहिल्या वीकेंडलाही खूप चांगली कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT