Vicky Kaushal esakal
मनोरंजन

Vicky Kaushal : विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजीराजे! चाहत्यांना उत्सुकता

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा कलाकार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Vicky Kaushal : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जाणारा कलाकार आहे. तो केवळ रंजकपटामध्ये न दिसता हटक्या भूमिका करणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. असे म्हटले जाते. आता विकीच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. ही भूमिका अभिनेता विकी कौशल साकारणार आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे विकी कौशलच्या या चित्रपटाविषयी चाहत्यांना, नेटकऱ्यांना कमालीची उत्सुकता आहे.

Also Read - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटामध्ये देखील बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार दिसणार आहे. अक्षयच्या नावाला सोशल मीडियावर वाद झालेला दिसून आला. जेव्हा अक्षयनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील तो व्हिडिओ शेयर केला होता. त्यावरुन त्याच्या त्या लूकवर टीका करण्यात आली होती.

काही नेटकऱ्यांनी अक्षय कुमारचं कौतूकही केलं होतं. आता विकी कौशलची बातमी व्हायरल झाल्यानं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. आता चाहत्यांना विकीच्या त्या चित्रपटाची उत्सुकता आहे. यापूर्वी विकीनं सरदार उधम, उरी, या चित्रपटातून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.

विकी कौशलचा काही दिवसांपूर्वी गोविंदा नाम मेरा नावाचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आता तो प्रसिद्ध दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या एका चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी सुत्रांनी दिली आहे. त्या चित्रपटामध्ये सारा अली खानही दिसणार असल्याची चर्चा आहे. अद्याप या चित्रपटाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT