Vicky Kaushal Bollywood Actress Sam Bahadur movie  esakal
मनोरंजन

Vikcy Kaushal : 'माझी आतापर्यतची 'ती' सगळ्यात खराब भूमिका होती'!

विकी कौशल हा आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या उरी या चित्रपटातील भूमिकेनं प्रेक्षकांना वेडं केलं होतं.

युगंधर ताजणे

Vicky Kaushal Bollywood Actress Sam Bahadur movie : विकी कौशल हा आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या उरी या चित्रपटातील भूमिकेनं प्रेक्षकांना वेडं केलं होतं. त्यासाठी त्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात देखील आले होते. सध्या त्याचा सॅम बहादूर नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे.

विकी आणि सॅम बहादूरची टीम जोरदारपणे प्रमोशन करताना दिसत आहे. एक्सप्रेस अड्डावर विकीची नुकतीच मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यानं त्याच्या एका चित्रपटातील भूमिकेविषयी सांगितलं. त्यात तो म्हणाला की, तो चित्रपट आणि त्यातील माझी ती भूमिका आतापर्यतचा माझा सर्वात खराब परफॉर्मन्स होता. विकीच्या चाहत्यांना प्रश्न पडला आहे की, तो कोणत्या चित्रपट आणि दिग्दर्शकाविषयी बोलतो आहे.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

सॅम बहादूर येत्या एक डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यात सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेख यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विकीनं भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. विकीनं द इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात आपल्या नव्या चित्रपटाविषयी गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्यानं केलेलं ते वक्तव्य चर्चेत आलं आहे.

विकीनं त्याच्या फिल्मी करिअरविषयी परखडपणे त्याची भूमिका मांडली आहे. तो त्या मुलाखतीमध्ये म्हणाला की, मी जेव्हा अनुराग कश्यपचा रमन राघव २.० केला तेव्हा त्यातील माझी भूमिका ही मला आवडली नव्हती. ती माझी आतापर्यतची सगळ्यात खराब भूमिका होती. असे विकीनं म्हटलं आहे. तो म्हणाला की, रमन राघव २.० ही एक डार्क फिल्म होती. त्यात मी एका पोलिसाची भूमिका साकारली होती. ती भूमिका माझ्या कुटूंबियांना आवडली. पण त्यांना मी कशाप्रकारचा पोलीस आहे हे त्यांना सांगितले नव्हते.

तो चित्रपट आणि त्याची स्टोरी वेगळीच होती. एका सीरिअल किलरविषयी भाष्य करणारी ती फिल्म होती. तुम्हाला खरं सांगतो की, त्या चित्रपटातील माझी भूमिका ही आतापर्यतची सगळ्यात खराब भूमिका होती. कारण ती भूमिका साकारताना मला असे वाटले की, मी अजूनही त्याप्रकारचे वेगवेगळे अनुभव घेतलेले नाहीत.

मी स्वताला नेहमीच एक जिद्दी अभिनेता मानत आलो आहे. जेव्हा मी पहिल्यांदा अभिनेता व्हायचा विचार केला तेव्हा मी इंजिनिअरींग करत होतो. मी ग्रॅज्युएशनही केलं नव्हतं. पण मला आत्मविश्वास होता की, मी काही चांगले काम करु शकतो. मसानपासून सुरुवात झाली. तो चित्रपट आणि त्यावेळचा माहौलही त्याला फारसा पोषक नव्हता. पण मी नेटानं माझी वाटचाल सुरु ठेवली. याचा अभिमान आहे. असेही विकीनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Tension: तणाव पुन्हा वाढला! कराराची घाई नाही; इराणने अटी मानल्या नाहीत तर हल्ला करू, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी

IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

IPL 2026 Final, RCB vs GT live: बंगळुरू - गुजरात संघात महामुकाबला! BCCI निवड समिती प्रमुखांसह डिविलियर्सही अहमदाबादमध्ये दाखल

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT