vicky 
मनोरंजन

अभिनेता विकी कौशल 'या' भूमिकेसाठी वाढवणार १०० किलोपेक्षा जास्त वजन

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता विकी कौशलकडे एका पेक्षा एक जबरदस्त सिनेमे आहेत. असाच एक सिनेमा आहे ज्यासाठी तो त्याचा लूक बदलणार आहे. 'द इम्मॉर्टल अश्वत्थामा' या सिनेमातील भूमिकेसाठी विकी कौशलचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो महाभारताच्या महान आणि अमर योद्धा अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं शूटींग एप्रिल २०२१ मध्ये सुरु होणार आहे. हा सिनेमा ३ भागांमध्ये रिलीज होणार आहे ज्यामध्ये अश्वत्थामाला मॉर्डन दिवसातल्या सुपरहिरोच्या रुपात दाखवलं जाईल. विशेष म्हणजे या भूमिकेसाठी विकीला १०० किलोपेक्षा जास्त वजन वाढवायचं आहे. यासाठी तो वर्कआऊट तर करतोय आहे मात्र त्याला घोडेसवारी, जुजत्सु आणि क्रव मागा सारखे मार्शल आर्ट्सची देखील ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. सिनेमाचं शूटींग युरोपमध्ये सुरु होऊन मुंबऊमध्ये त्याचा शेवट होईल. याचं शूटींग ग्रीनलँड, आइसलँड, इंग्लंड, टोक्यो, न्युझीलँड नबीमिया इत्यादी देशांमध्ये होणार आहे. अश्वत्थामा गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा होता ज्याला अमरत्वाचा आशिर्वाद मिळाला होता. 

vicky kaushal to gain more than 100 kgs weight for his next the immortal ashwatthama    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT