Vicky Kaushal &Katrina Kaif, Rajkumar Rao & Patralekha Google
मनोरंजन

विकी-कतरिना ते राजकुमार-पत्रलेखा असं करणार आहेत व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन

अनेकजण आपल्या शूटिंग-प्रमोशनमधून वेळ काढत लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेट करणार आहेत.

प्रणाली मोरे

सध्या व्हॅलेंटाईन सप्ताह(Valentine Week) साजरा केला जात आहे. हे दिवस प्रेम करणाऱ्यांचे हक्काचे दिवस असतात. त्याहीपेक्षा हे दिवस प्रेमी युगुलांसाठी खूप खास असतात असं म्हटलं तर योग्य ठरेल.. या दिवसात आपला जोडीदार खुश कसा होईल यासाठी प्रयत्न केले जातात. गेल्या काही दिवसांत बॉलीवूड आणि टी.व्ही इंडस्ट्रीतील अनेक कपल्स लग्नबंधनात अडकले आहेत. ज्यामध्ये विकी-कतरिना,राजकुमार राव-पत्रलेखा,अंकिता लोखंडे-विकी जैन अशा अनेक जणांची नावं घेता येतील. लग्नानंतरचा पहिला 'व्हॅलेंटाईन' हे सगळे एकत्र साजरा करणार आहेत असं कळतंय. त्यामुळे अर्थातच १४ फेब्रुवारीसाठीही त्यांचे काही विशेष नियोजन असणार हे नक्की.

Vicky Kaushal,Katrina Kaif

कतरिना कैफ-विकी जैन

कतरिना(Katrina Kaif) आणि विकी(Viucky Kaushal) बॉलीवूडच्या चर्चित कपल्सपैकी एक. गेल्या वर्षी ९ डिसेंबरला या दोघांनी राजस्थानमध्ये रॉयल अंदाजात लग्नगाठ बांधली. लग्नानंतरचा विकी-कतरिनाचा हा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे. लग्नानंतर आपण पाहिलंय की कतरिना-विकी प्रत्येक सण एकत्र साजरा करताना दिसले आहेत. या दोघांबाबतीत बातमी होती की व्हॅलेंटाईन डेला देखील हे दोघे कामात व्यस्त असणार आहेत. विकी भारतात शुटिंग करणार असला तरी कतरिना मात्र परदेशात असेल. पण सुत्रांच्या माहितीनुसार आता कळतंय की हे दोघे व्हॅलेंटाईन एकत्र भारतात साजरा करणार आहे. कतरिना व्हॅलेंटाईनसाठी भारतात परतणार आहे.

Ankita Lokhande,Vicky Jain

अंकिता लोखंडे-विकी जैन

छोट्या पडद्यावरील सगळ्यात प्रसिद्ध चेहरा म्हणजे अंकिता लोखंडे. अभिनेत्रीनं गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतरही विकी आणि ती अनेकदा मॅरेज लाइफ कधी त्यांच्या हनिमून हॉलिडेजमधून तर कधी फ्रेंड पार्टीजमधून एन्जॉय करताना दिसले आहेत. नुकतीच अंकिता बिलासपूरला आपल्या सासरी भेट देऊन आली आहे. ती अनेक पारंपरिक चालीरीतींचा सन्मान करताना दिसली आहे. या दोघांसाठीही यंदाचा लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन स्पेशल असणार आहे. हे दोघेही तो दिवस एकत्र एन्जॉय करणार आहेत. त्यानिमित्तानं एक डिनर डेट त्यांनी प्लॅन केल्याचं समजतंय.

Rajkumar Rao,Patralekha

राजकुमार राव-पत्रलेखा

राजकुमार राव-पत्रलेखानं जवळजवळ ११ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्यावर्षी १५ नोव्हेंबरला लग्न केलं. खरंतर दोघांनी कितीतरी व्हॅलेंटाईन एकत्र साजरे केले असतील. पण लग्नानंतरचा हा पहिलाचा व्हॅलेंटाईन आहे जे ते दोघे एकत्र साजरा करणार आहेत. या दोघांचं लग्न एका गोष्टीमुळे खूप दिवस चर्चेत होतं. त्यांच्या लग्नात पत्रलेखानं राजकुमार रावला सिंदूर लावंल होतं ज्याची खूप चर्चा झाली होती. सध्या राजकुमार राव 'बधाई दो' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण कळतंय की त्यानं आपल्या बिझी शेड्युलमधून एक दिवस पत्रलेखासाठी ठेवला आहे. ज्या दिवशी ते त्यांच्या लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करणार आहे. त्यादिवशी त्यानं प्रमोशनल कार्यक्रमातून सुट्टी काढल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT