vicky kaushal playing dahi handi with kids the great indian family movie promotion  SAKAL
मनोरंजन

Janmashtami 2023: विकी कौशलने लहान मुलांसोबत साजरी केली दहीहंडी, आठवणीत रमला, फोटो व्हायरल

विकी कौशलने लहान मुलांसोबत दहीहंडीचा आनंद घेतलाय

Devendra Jadhav

Vicky Kaushal News: आज श्रीकृष्ण जन्माष्टमी. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आज ठिकठिकाणी दहीहंडी उत्साहात साजरी होत आहे. आज मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातली गोविंदा पथकं विविध ठिकाणी थरावर थर रचून हंडी उत्साहात साजरी करत आहेत.

अशातच सर्व तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला अभिनेता विकी कौशल बाल गोपाळांसोबत दहीहंडी उत्साहात साजरी केलीय. दहीहंडी साजरी करतानाच विकी जुन्या आठवणीत रमलेला दिसलाय.

(vicky kaushal playing dahi handi with kids)

बॉलीवूड स्टार विकी कौशल यावर्षी दहीहंडी साजरी करण्यास उत्सुक आहे. कारण तो जन्माष्टमीच्या उत्सवादरम्यान त्याचा आगामी चित्रपट द ग्रेट इंडियन फॅमिली (TGIF) चे प्रमोशन करत आहे! विकी मुंबईतील एका दहीहंडी कार्यक्रमात सहभागी होणार आहे आणि हजारो लोकांना त्याच्या TGIF मधील नवीनतम सॉन्ग कन्हैया ट्विटर पे आजा वर नृत्य करायला लावेल जे सध्या संगीत चार्टवर चढत आहे!

विकी म्हणतो, “मुंबईत लहानाचा मोठा झाल्यामुळे दहीहंडी हा फक्त एक उत्सव नाही हे मला कळून चुकले. हा सण सर्व लोकांच्या आत्म्याबद्दल, ऐक्याबद्दल आणि अतूट बंधनांचं प्रतीक होते. 'हंडी' फोडण्यासाठी रचलेले मानवी पिरॅमिड हा लवचिकता आणि एकात्मतेचे शक्तिशाली रूपक आहे, असे मला नेहमीच वाटायचे. हा सण भारताचा आत्मा प्रतिबिंबित करतो.”

तो पुढे म्हणतो, “मला खूप आनंद होत आहे की, या वर्षी मी त्या दहीहंडीसारख्या सुंदर वातावरणाचा एक भाग बनले आहे आणि अशा उत्साही मुलांसोबत हा सण साजरा करतोय. स्थानिक दहीहंडी उत्सवासाठी मी माझ्या कुटुंबासोबत जायचो, त्यामुळे यंदा माझ्या बालपणीच्या आठवणी नक्कीच जागा होतील.”

'जरा हटके जरा बचके' नंतर आता विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा प्रेक्षकांना लोटपोट हसण्यासाठी येत आहे.

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित कौटुंबिक मनोरंजन करणारा द ग्रेट इंडियन फॅमिली, 22 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT