Vicky Kaushal Share a childhood school memory photo... Instagram
मनोरंजन

Bollywood: लहानपणी स्टेजवर सगळ्यात मागे असणारा 'हा' अभिनेता आता बॉलीवूडमध्ये बड्या स्टार्सना पडतोय भारी

अनेकदा बॉलीवूडचे बडे स्टार्स सोशल मीडियावर आपल्या लहनपणीच्या आठवणी शेअर करताना दिसतात. त्यांचे ते .युनिक फोटो तुफान व्हायरल देखील होतात.

प्रणाली मोरे

Bollywood: सोशल मीडियामुळे जग खूप जवळ येत चाललंय असं उगाच नाही म्हणत कुणी. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता ताऱ्यांसारखे लांब वाटणारे आपले आवडते बॉलीवूड स्टार्सही आपल्या जवळ आलेयत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खडानखडा माहिती त्यांच्या चाहत्यांना माहित होते ते सोशल मीडियामुळेच. अर्थात हे कलाकार देखील इथे व्यक्त होतात,अगदी आपल्या लहानपणीचा काळही ते चाहत्यांसोबत शेअर करतात. केवळ ग्लॅमरस फोटो नाहीत तर आपले लहानपणीचे फोटो देखील हे स्टार्स चाहत्यांसोबत शेअर करतात. अन् मग काय, हे फोटो अगदी वाऱ्यासारखे सर्वत्र पसरतात म्हणजेच व्हायरल म्हणायचंय हो आम्हाला.(Vicky Kaushal Share a childhood school memory photo...)

सध्या असाच एक फोटो एका बड्या बॉलीवूड कलाकाराचा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. अर्थात त्या अभिनेत्यानं त्याचा लहानपणीचा स्टेजवर मागे गर्दीत नाचतानाचा फोटो शेअर केला आहे. तो त्याच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाचा फोटो आहे. आता फोटो पाहून पटकन त्या किरकोळ मुलाला तुम्हाला नक्कीच ओळखता आलं नसणार कदाचित. म्हणून नाव सांगून टाकतो ,तो आहे आपल्या सगळ्यांचा लाडका,सध्याचा उत्तम अभिनेता विकी कौशल. विकीनं आपला तो फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शनही झकास दिलंय.

विकीनं आपला तो लहानपणीचा फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, ''Background mein dance karne ka bohot experience hai life mein!'' (आयुष्यात मागे नाचण्याचा खूप अनुभव आहे मला...) यासोबत विकीनं आपल्या 'गोविंदा नाम है मेरा' या आपल्या सिनेमाचा हॅशटॅगही वापरला आहे. विकीच्या या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. विकीची फोटोतील ती लहानपणीची पोझ पाहून अनेकांनी त्याला 'बिजली' म्हणून संबोधलं आहे. अर्थात सध्या विकीच्या 'गोविंदा नाम है मेरा' सिनेमातील 'बिजली' गाणं खूप गाजतंय.

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

'मसान','उरी','राझी', 'सरदार उधमसिंग', 'लस्ट स्टोरीज','संजू'.... असे एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे करणाऱ्या विकीनं बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यानं फारसा बॉलीवूडला हवा तसा चेहरा-मोहरा नसतानाही आपल्या अभिनयाच्या बळावर टॉपच्या स्टार्समध्ये आपलं स्थान पक्क केलं आणि इतकंच काय तर बॉलीवूडची सगळ्यात देखणी अभिनेत्री कतरिना कैफसोबत लग्नही केलं. सध्या विकी चर्चेत आहे ते त्याच्या आगामी 'गोविंदा नाम है मेरा' या सिनेमामुळे. या सिनेमात त्याच्या सोबत कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT