Salman Khan Google
मनोरंजन

Video: दिल्लीच्या रस्त्यांवर सलमान एकटा फिरताना दिसला अन्...

दबंग खाननं स्वतः सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून सांगितली गोष्ट...

प्रणाली मोरे

सलमान खानचा(Salman Khan) एक व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला गेला आहे,जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शेवटी व्हिडीओ 'टायगर' चा आहे बॉस...पण काय आहे असं त्या व्हिडीओत. तर सलमान सध्या दिल्लीत आहे,अन् तिथे चक्क तो बॉडीगार्डच्या गराड्यात नाही तर अगदी स्वच्छंदीपणे दिल्लीच्या रस्त्यांवर फिरताना दिसतोय.सध्या सलमान 'टायगर ३' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शूटिंग दिल्लीत सुरू आहे. त्याच्यासोबत तिथे सिनेमातील अभिनेत्री कतरिना कैफ देखील आहे. कोणत्यातरी सलमान खानच्या चाहत्यानं सलमानचा हा व्हिडीओ शेअर करीत त्याच्या अकाऊंटवर रीपोस्ट केला आहे. त्यानं कॅप्शन दिलं आहे की,''मेगास्टार सलमान खान,टायगर ३...''

व्हिडीओत सलमान खान तो राहत असलेल्या इमारतीच्या बाहेर येताना दिसत आहे. त्यानं तपकिरी रंगाचं जॅकेट घातलंय आणि जीन्स असा एंकदरीत पेहराव केला आहे. त्यानं काळ्या रंगाच्या फ्रेमचे गॉगल्सही डोळ्यावर चढवले आहेत. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला 'एक था टायगर' सिनेमातील गाणं ऐकायला येत आहे. सलमाननं व्हिडीओ पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं आहे,''#Delhi'' in the Video. एका चाहत्यानं या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे,''सुपर्ब सल्लू. तू तुझ्या व्यक्तीमत्त्वामधून समोरच्याची बोलती बंद करतोस''. तर एकानं म्हटलं आहे,''रुबाबदार चाल''. अशा विविध प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत.

हा व्हिडीओ सलमाननं 'टायगर ३' चं शूटिंग दिल्लीत सुरू झाल्यानंतर एक दिवसानी पोस्ट केला आहे. खरं तर जानेवारी १२ ला या सिनेमाचं शूटिंग होणार होतं. पण कोविड निर्बंधांमुळे ते पुढे ढकलत ढकलत आता फेब्रुवारीमध्ये सुरू केलं गेलं. 'टायगर ३' चं शूटिंग तुर्की,रशिया,ऑस्ट्रिया अशा परदेशातील ठिकाणीही करण्यात आलं आहे. आता सर्वांना प्रतिक्षा आहे दंबग खानचा 'टायगर ३' कधी पहायला मिळतोय त्या दिवसाची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT