video viral iranian woman dance on sholay jab tak hai jaan  
मनोरंजन

इराणी महिला झाली 'शोलेची बसंती'; जब तक है जान वर नाचली, व्हिडिओ व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचे चाहते सा-या जगभरात पसरले आहेत. त्याची काही कमी नाही. वेगवेगळ्या देशांमधून हिंदी चित्रपटांची क्रेझ त्यांना असल्याचे दिसुन आले आहे. यापूर्वी आमीर खान, सलमान खान आणि शाहरुखच्या अनेक चित्रपटांना परदेशांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करुन देण्यात परदेशी प्रेक्षकांचा मोठा सहभाग आहे. शोले हा बॉलीवूडचा माईलस्टोन चित्रपट. या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले. आयकॉनिक चित्रपट म्हणून त्याचे नाव घ्यावे लागेल. त्याची कथा, संवाद, अभिनय आणि गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. तीन दशकाहून अधिक काळ या चित्रपटानं भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. केवळ भारतीयच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही त्या चित्रपटानं वेड लावलं आहे.

असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो आहे शोले चित्रपटातील गाण्याचा. त्या गाण्यावर एका इराणी महिलेनं डान्स केला आहे. तो कमालीचा लोकप्रिय झाला आहे. नेटक-यांकडून त्याला मोठा प्रतिसादही मिळाला आहे. त्या महिलेनं शोलेतील बसंतीची भूमिका करत जब तक है जान गाण्यावर केलेला डान्स सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्या महिलेच्या बाजूला एक जण धर्मेंद्रच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. शोले चित्रपटातील गाणी, संवाद हा प्रेक्षकांच्या विशेष आवडीचा विषय आहे. त्यावरुन कोणी व्हिडिओ किंवा मीम्स तयार करताना पाहायला मिळते. आता त्या इराणी महिलेनं केलेला डान्स चर्चेचा विषय आहे.

त्या व्हिडिओमध्ये शोले चित्रपटात जब तक है जानच्या वेळेस ज्यापध्दतीनं सेट तयार केला गेला होता तसा सेट बनवला गेला आहे. त्याला सोशल मीडियावर अनेकांनी लाईक्स केले आहे. त्यावेळी एक महिला डान्स करताना दिसत आहे. वीरुच्या भूमिकेत असलेल्या एकाला दोरीनं बांधलेलं आहे. दुसरीकडे गब्बर त्या डान्सचा आनंद घेताना दिसत आहे. अशाप्रकारे एका वेगळ्या माहोलमध्ये तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओला नेटक-यांची चांगलीच दाद मिळत आहे. भलेही त्यांना त्या गाण्याचा अर्थ पूर्णपणे उमजला नसेल तरीही त्यांना केलेला प्रयत्न कौतूकास्पद असल्याची प्रतिक्रिया काही नेटक-यांनी दिली आहे. 

शोले चित्रपटात बसंतीची भूमिका प्रसिध्द अभिनेत्री हेमा मालिनी यांनी केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी एका रियॅलिटी शो मध्ये आल्यावर त्यांनी शोले बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला होता. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी कशाप्रकारे कलाकारांकडून त्यांना अभिप्रेत असलेलं काम करुन घेतलं. शोले करताना समोर आलेल्या अडचणी त्यावर केलेली मात, त्याला मिळालेलं यश, तो प्रदर्शित झाल्यानंतर मिळालेला प्रतिसाद, काही काळानं शोले चित्रपटाचे तयार झालेले किस्से यावेळी हेमा मालिनी यांनी शेअर केले होते.

या गाण्यामध्ये ती इराणी महिला हेमा मालिनीच्या भूमिकेत आहे. तिनं बसंतीचे पात्र साकारले आहे. ती ज्यावेळी नाचते तेव्हा वीरुच्या भूमिकेत असलेल्या एकाला दोरीनं बांधून ठेवलं आहे. तर गब्बर आणि सांभा हे दोघेही बसंतीचा डान्स पाहत आहेत. त्यांच्या हातात बंदूक आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : मुंबईला जाणारच, १२ तारखेला घोषणा करणार - मनोज जरांगे पाटील

SCROLL FOR NEXT