pushpa review  esakal
मनोरंजन

Video Viral: चिंपाझी झाला 'पुष्पाचा' फॅन, 'श्रीवल्ली'वर केला डान्स

अल्लु अर्जुनच्या पुष्पाची लोकप्रियता अजुनही कायम आहे, पुष्पानं (Tollywood News) केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडच्या प्रेक्षकांना वेड लावले होते.

युगंधर ताजणे

Pushpa Movie: अल्लु अर्जुनच्या पुष्पाची लोकप्रियता अजुनही कायम आहे, पुष्पानं (Tollywood News) केवळ टॉलीवूडच नाहीतर बॉलीवूडच्या प्रेक्षकांना वेड लावले होते. त्या चित्रपटातील गाण्यांवर सोशल मीडियावर धुमाकुळ घातल्याचे दिसून (Bollywood Movies) आले होते. पुष्पा फेम अल्लु अर्जुननं त्यात श्रीवल्ली गाण्यावर (Shrivallil Song) जो डान्स केला तो जगभरातील त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. यंदाच्या वर्षी सोशल मीडियावर सर्वाधिक रिल्स या गाण्याचे झाले आहेत. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Social Media viral news) त्यामध्ये एका चिंपाझीनं श्रीवल्ली गाण्यावर भन्नाट डान्स करुन नेटकऱ्यांची पसंती मिळवली आहे. गाणीच नाहीतर पुष्पाच्या डायलॉगलाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

अल्लु अर्जुनच्या पुष्पावरील चाहत्यांचे प्रेम अजुनही संपलेले नाही. या चित्रपटाची वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होतच असते. पुष्पामध्ये अल्लु अर्जुन, समंथा अक्कीनेनी आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आता प्राणीसंग्रहालयातील एका चिंपाझीनं श्रीवल्ली गाण्यावर केलेला डान्स कमालीचा लोकप्रिय झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. अनेकांना त्या चिंपाझीचं नवल वाटलं आहे. त्या व्हिडिओमध्ये तो चिंपाझी अशा प्रकारे चालत आहे जसा अल्लु अर्जुन पुष्पा गाण्यामध्ये नाचताना दिसतो. त्यामुळे नेटकऱ्यांना तो व्हिडिओ प्रचंड भावला असून त्यांनी त्या चिंपाझीच्या डान्सला मनापासून दाद दिली आहे. त्या व्हिडिओला आतापर्यत 13 लाख लाईक्स मिळाले आहेत.

अल्लु अर्जुनचा पुष्पा आता ओटीटीवर देखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दोनशे को़टींपेक्षा अधिक बिझनेस केल्याचे सांगितले जात आहे. पुष्पा हा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानं दोन आठवड्यातच स्वताच्या नावावर वेगळा विक्रम केला होता. त्याच्या बरोबरीनं प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना पुष्पानं धोबीपछाड केलं आहे. आता प्रेक्षकांना पुष्पा 2 चे वेध लागले आहेत. त्यात बॉलीवूडची अभिनेत्री दिशा पटानी ही स्पेशल साँग करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT