Vidya Balan On Daughter Rumours Esakal
मनोरंजन

Vidya Balan: काय सांगता विद्या एका मुलीची आई? शेवटी अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, "ती माझी..."

Vaishali Patil

Vidya Balan On Daughter Rumours: गेल्या काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला होता. या व्हिडिओत विद्या विमानतळावर जात होती. मात्र यावेळी तिच्यासोबत एक मुलगी दिसली.

विद्या या मुलीला घेऊन प्रवासाला निघाली होती. "विद्या तिच्या गोंडस मुलीसोबत" अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आला होता.

त्यानंतर विद्याला इतकी मोठी मुलगी आहे का? तिने आपल्या मुलीला का लपवून ठेवलं? ती तिच्या पतीच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी विचारायला सुरुवात केली.

तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप चर्चेत आला होता. आता या सर्व अफवानंतर अखेर विद्यानेच तिच आणि त्या मुलीचं काय नात आहे? याचा खुलासा केला आहे.

नुकत्याच एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने तिच्या सीक्रेट मुलीबद्दल सांगितले आहे.

त्या मुलीबद्दल बोलताना विद्या बालन म्हणाली, "ती माझ्या बहिणीची मुलगी इरा आहे! तिला जुळी मुले आहेत. एक मुलगा रुहान आणि दुसरी मुलगी इरा."

विद्या आपल्या बहिणीच्या मुलांवर देखील आईसारखे प्रेम करते असंही तिनं सांगितलं. ती या दोघांना प्रेमाने "ट्विन लाईफलाइन्स" असं म्हणते. म्हणजेच व्हिडिओतील व्हायरल मुलगी विद्याची नाही तर तिच्या बहिणीची आहे. सध्या सोशल मीडियावर विद्याची चर्चा आहे.

विद्या बालनने चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले आहे. त्यांनी १४ डिसेंबर २०१२ रोजी तामिळ आणि पंजाबी पद्धतीने लग्न केले.

या लग्नाला दोघांचे फक्त जवळचे मित्र उपस्थित होते. विद्या बालन ही सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी आहे. सिद्धार्थची पहिली पत्नी त्याची बालपणीची मैत्रीण आरती बजाज होती, दोघांना एक मुलगा आहे.

विद्या आणि सिद्धार्थच्या लग्नाला 11 वर्षे झाली असून विद्या अजून आई बनलेली नाही.

विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'नियत' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात त्याने गुप्तहेराची भूमिका साकारली होती.

मात्र हा चित्रपट काही खास कमाल करु शकला नाही. ती लवकरच 'लव्हर्स' चित्रपटात इलियाना डिक्रूझ आणि प्रतीक गांधीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

Arijit Singh Possible to enter in Politics : अरिजीत सिंह राजकारणात करतोय एन्ट्री? ; पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ!

Ajit Pawar : दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी अर्पण केली श्रद्धांजली, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठांत शुकशुकाट

Ajit Pawar :...ही दादांची सभा नव्हे दोस्ता, अखेरच्या निरोपाची वेळ आहे! विविध रंगछटा व हास्यमुद्रेतील दादांचे १२ फ्लेक्स पाहून कार्यकर्ते गहिवरले

T20 World Cup 2026 जिंकून सूर्यकुमारच्या नेतृ्त्वात टीम इंडिया इतिहास घडवणार? रवी शास्त्री म्हणाले, '१० मिनिटांचा खेळ...'

SCROLL FOR NEXT