Happy Birthday Vidya Balan  Esakal
मनोरंजन

Vidya Balan Birthday : विद्यावर का आली होती 5 स्टार हॉटेल बाहेर भिक मागायती वेळ? स्वत:च केला होता खुलासा...

Vaishali Patil

Happy Birthday Vidya Balan सौंदर्याने आणि आपल्या दमदार अभिनयानं मनोरंजन विश्वात वेगळी ओखख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. तिने अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ती ओळखली जाते. आजही तिच्या भूमिका सर्वांच्या लक्षात राहतात.

ती बऱ्याच दिवसांपासून चित्रपट जगतापासून दूर होती. मात्र ती सोशल मिडियावर तुफान सक्रिय असते. ती शेवटची 'नियत' या चित्रपटात दिसली होती. आज विद्या तिचा 45 वा वाढिदवस साजरा करत आहे. यानिमित्त तिने सांगितलेला एक किस्सा आपण जाणून घेऊया.

तिने एका मुलाखतीत सांगतिलं की, तिने कसे एकदा डेयर करण्यासाठी तिने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलबाहेर भिकारी असल्याचे नाटक केले होते.

तिने असे का केले यामागचे कारणही खूपच विचित्र आहे. तिने हे फक्त जिम-जॅम बिस्किटांसाठी हे काम केलं होते.

Mashable ला दिलेल्या मुलाखतीत विद्या म्हणाली की , " आमचा IMG म्हणजेच इंडियन म्यूजिक ग्रुप नावाचा गुप्र होता. ते दरवर्षी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आणि भारतीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करायचे.

हा तीन दिवसांचा शो असायचा जो रात्रभर चालायचा. तो खुप अप्रतिम असायचा. मी त्यात आयोजन समितीत स्वयंसेवक होते.

आम्ही सर्व कार्यक्रम व्यवस्थित व्हावा यासाठीमदत करायचो आणि मग रात्री कार्यक्रम संपला की आम्ही सर्वजण नरिमन पॉइंटकडे फिरायला जायचो."

विद्या बालन पुढे म्हणाली, “एकदा मला चॅलेंज देण्यात आले होते. त्यांनी मला Oberoi- The Palms येथील कॉफी शॉपमध्ये जाऊन दरवाजा ठोठावण्यास सांगितले आणि काहीतरी खाण्यासाठी मागायला लावले.

मी अभिनेत्री होते हे त्यांना माहीत नव्हते. मी दार ठोठावत राहिले. तेव्हा सगळे माझी छेड काढू लागले. मी खूप वेळ दरवाजा ठोकला.

मी म्हणाले की प्लीज, मला भूक लागली आहे. कालपासून मी काहीच खाल्ले नाही. यानंतर माझा मित्र खजील झाला आणि त्याने मला यायला सांगितले. जरी मी पैज जिंकली."

जिम जॅम बिस्किटावर तिचं किती प्रेम होत. हे देखील तिने सांगितलं. विद्या म्हणाली- “ते चॅलेंज जिम जॅम बिस्किटसाठी होते. त्या मैफिलीसाठी आमचा प्रायोजक ब्रिटानिया होता आणि आमच्याकडे भरपूर बिस्किटे होती. पण मी म्हणाले होते की मी जिंकले तर मला जिम जॅमचे आणखी एक पॅकेट मिळेल आणि मी तसं केलं.

अशाप्रकरे फक्त जिम जॅम बिस्किटाचे आणखी एक पॅकेट मिळावे यासाठी तिने चक्क हॉटेल बाहेर भीक मागितल्याचे तिने सांगतिले.

चित्रपटांपूर्वी विद्या बालनने 'हम पांच' या लोकप्रिय टीव्ही शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तेव्हा अभिनेत्री फक्त 16 वर्षांची होती. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर निर्मित हा शो देखील खूप आवडला होता. आता विद्याची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. तिची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT