vidya balan 
मनोरंजन

विद्या बालन म्हणतेय माझा फोन स्वतःचंच डोकं वापरतो, स्वतःच स्वतःला हवं ते शूट करतो, पहा मजेशीर व्हिडिओ

सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. विद्याचं म्हणणं आहे की तिच्या फोनच्या कॅमेरामध्ये स्वतःचंच डोकं आहे जो कोणत्याही गोष्टीला पाहिल्यानंतर लगेचच ते टिपायचा प्रयत्न करतो. विद्याने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ती तिच्या बाजुला असलेलं टेबल फ्रेममधून बाहेर करत आहेत तर दुस-या व्हिडिओमध्ये ती तिच्या साडीचा पदर व्यवस्थित करताना दिसत आहे. 

विद्या हा व्हिडिओ शेअर करताना लिहिते, १. जेव्हा तुम्हाला स्वतःची फ्रेम स्वतःच सेट करावी लागते आणि ते करत असताना तुम्हाला दिसतं की टेबलची एक कडा तुमच्या फ्रेमध्ये दिसत आहे तेव्हा मी माझी पोझिशन न बदलता धक्का देऊन ती कडा फ्रेमच्या बाहेर करण्याचा प्रयत्न करते. २. आणि ही मी आहे जी शॉटच्या आधी माझी साडी आणि केस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही वेळी माझा हा प्रयत्न होता की रेकॉर्डिंग सुरु होण्याआधी सगळ्या गोष्टी जागच्या जागच्या व्यवस्थित असतील. मात्र मला असं वाटतं की माझ्या फोनच्या कॅमे-यामध्ये त्याचं स्वतःच डोकं आहे. जो कोणत्याही गोष्टीला पाहिल्यावर त्याला लगेच ती गोष्ट कॅमेरात बंद करायला आवडते.

विद्याच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी 'क्युट', 'गोड' अशा कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय विद्याचं असंही म्हणणं आहे की, 'लोक अनेक गोष्टींवर अवलंबुन आहेत. मात्र कोरोना व्हायरमुळे असलेल्या या लॉकडाऊनने त्यांना ही जाणीव करुन दिली आहे की अशी कोणतीच गोष्ट नाहीये की जिच्यामुळे ते राहु शकत नाहीत आणि ते स्वयंपूर्ण होऊ शकतात.'

vidya balan shares the struggles of shooting a home video amid coronavirus lockdown  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT