vidyut jammwal  esakal
मनोरंजन

Vidyut Jammwal: चित्रपट समीक्षकानं विद्युत जामवालकडं मागितली लाच? अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

Vidyut Jammwal: सध्या विद्युत हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. या ट्वीटच्या माध्यमातून विद्युतनं एका चित्रपट समीक्षकावर आरोप केला आहे.

priyanka kulkarni

Vidyut Jammwal: अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) हा सध्या त्याच्या क्रॅक (Crakk) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं विद्युतनं प्रमोशन केलं. 23 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज झाला. पण या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. सध्या विद्युत हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. या ट्वीटच्या माध्यमातून विद्युतनं एका चित्रपट समीक्षकावर आरोप केला आहे.

विद्युतचं ट्वीट

विद्युतनं नुकतच एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमधून त्यानं एका चित्रपट समीक्षकावर लाच मागितल्याचा आरोप केला आहे. विद्युतनं एक स्क्रिनशॉर्ट ट्विटरवर शेअर केला आहे. या स्क्रिनशॉर्टमध्ये एका चित्रपट समीक्षकानं विद्युतला ब्लॉक केलं आहे, असं दिसत आहे. हा स्क्रिनशॉर्ट ट्विटरवर शेअर करुन विद्युतनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "लाच मागणे गुन्हा आहे आणि लाच देणे हा देखील गुन्हा आहे! मी लाच दिली नाही हा माझा गुन्हा आहे का??? प्रत्येक वेळी तू कोणाची तरी स्तुती करशील तेव्हा आम्हाला गुन्हेगार कोण आहे, हे आम्हाला माहित असेल." सध्या विद्युतच्या या ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

vidyut jammwal

क्रॅकची स्टार कास्ट

विद्युत जामवालचा 'क्रॅक - जीतेगा तो जियेगा' हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. विद्युत जामवाल व्यतिरिक्त क्रॅकमध्ये एमी जॅक्सन, अर्जुन रामपाल आणि नोरा फतेही यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Parli Vaijnath News : सलग दुसऱ्या वेळा राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभा मुंडेंने केली पाच सुवर्णपदकांची कमाई

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Update LIVE : सबरीमाला प्रकरण: एसआयटीने माजी टीडीबी अध्यक्ष पद्मकुमार यांना केली अटक

SCROLL FOR NEXT