Vidyut Jammwal  Google
मनोरंजन

Video: बर्फाच्या पाण्यात विद्युतची उडी; चाहते मात्र गारठले

बॉलीवूड अभिनेता विद्युत जामवाल सध्या परदेशात फिरण्याचा आनंद लुटत आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचा रीअल अॅक्शन हिरो विद्युत जामवालच्या (Vidyut Jammwal) एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडीओत विद्युत चक्क अंगावरचे थर्मल्स काढत उघड्या अंगानं बर्फाच्या थंडगार तळ्यात आंघोळीचा आंनद घेताना दिसतोय. आता विद्युत जामवला म्हटलं की अॅडव्हेंचर,अॅक्शन स्टार मग असं काहीतरी हटके झालंच पाहिजे नाही का. तो सध्या परदेशात एका टूरवर आहे. त्यानं तो नेमका कुठं गेलाय हे सूचित केलेलं नाही. पण तिथे पहायला मिळत आहे चहूकडे पांढराशुभ्र पसरलेला बर्फ आणि बर्फाच्याच पाण्याची छोटी छोटी तळी.

त्या व्हिडीओत दिसत आहे की,विद्युतनं थंडगार बर्फाळ वातावरणापासून संरक्षण व्हावं म्हणून थर्मल जम्पसूट आणि बूट घातले आहेत. पण त्यानंतर चक्क तो डेअरिंग करतो की एवढ्या थंडीत थर्मल्स काढून तो तिथल्या तळ्यात उतरून आंघोळ करतोय. त्यानं याचा एक व्हिडीओ त्याच्या सोशल इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. जो शेअर करताना त्यानं लिहिलं आहे,''तुमचा मेंदू तुम्हाला या वातावरणात इशारा देत असेल कदाचित की, तुला अनुभव नाहीय,हे खूप कठीण आहे पण ती सगळी नकारात्मकतेची बंधनं झुगारून द्या.आणि हे खूप सोपं आहे, मी करीनच असा विचार मनात आणून बिनधास्तपणे हा आगळा-वेगळा आनंद घ्या''. त्यानं पुढे लिहिलंय की,'' हा असा एक्सक्लुसिव्ह एक्सपीरिन्स तुमच्या बकेट लिस्ट मध्ये असलाच पाहिजे. माझ्यासाठी हा अनुभव म्हणजे कोणतीही दुखापत न होता,उलट तुमच्या सगळ्या आंतरिक-बाह्य जखमांतून बरे होऊन पुन्हा नव्यानं जन्म घेतल्याचा आनंद अनुभवण्यास देणारा हा क्षण''.

या व्हिडीओला काही वेळांतच पाच एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत. एका चाहत्यानं या व्हिडीओला प्रतिक्रिया देताना लिहिलं आहे,'कडक'. तर एकानं लिहिलंय,'रीअल हिरो'. तर एकानं तर चक्क विद्युतला बेअर ग्रील्सच्या जागेवर घेतलं पाहिजे त्याचा शो होस्ट करण्यासाठी इतपत म्हटलं आहे. तर अशा विविध प्रतिक्रिया विद्युतच्या या व्हिडीओवर वाचायला मिळत आहेत.

विद्युत 'सनक' या अॅक्शन पटात आपल्याला दिसला होता. कनिष्क वर्षानं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात रुक्मिणी माईत्रा,नेहा धुपिया,चंदन रॉय सन्यलही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसले होते. विद्युत सध्या डिझाईनर नंदिता महातनीसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. तिला त्यानं ज्यापद्धतीनं प्रपोज केलं होतं त्याची चर्चा झाली होती. आग्रा येथील मिलेट्री कॅम्पजवळील १५० मीटर उंच भींतीवरुन खाली उतरताना त्यानं हे हटके प्रपोज केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT